शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्त सातव करणार मनीष ठाकरेंची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:54 IST

हीन दर्जाचे भाष्य करून धक्काबुक्की करणारे बेजबाबदार ठाणेदार मनीष ठाकरे यांची उचलबांगडी करा, अन्यथा भीम आर्मी आपल्या स्टाईलने आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला.

ठळक मुद्देउचलबांगडी करा : भीम आर्मीचा सीपींना इशारा, अन्यथा आक्रमक आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हीन दर्जाचे भाष्य करून धक्काबुक्की करणारे बेजबाबदार ठाणेदार मनीष ठाकरे यांची उचलबांगडी करा, अन्यथा भीम आर्मी आपल्या स्टाईलने आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला. त्यापार्श्वभूमिवर सीपींनी या प्रकरणाची चौकशी उपायुक शशिकांत सातव यांच्याकडे सोपविली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठकी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीम आर्मीचे प्रदेश सचिव मनीष साठे, अमरावती जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर उपप्रमुख प्रवीण बनसोड व हेमंत कोडापे १५४ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्दाचे निवेदन देणार होते. दरम्यान गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी प्रवेशद्वारासमोरच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांशी हीन दर्जाचे भाष्य करीत तुच्छ वागणूक दिली आणि शिवीगाळ व लोटलाट करून खोटे गुन्हे नोंदविले. अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची तत्काळ उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात अटॅच करा, आमच्या तक्रारीवरून ठाणेदार ठाकरेंविरुद्ध गुन्हे दाखल करा, अन्यथा भीम आर्मी संघटनेच्यावतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे दिले.गाडगेनगर हद्दीतील अवैध धंद्यांचा पर्दाफाश करूभीम आर्मीच्या लेखी तक्रारीवरून जर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर कार्यकर्ते पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसेल. याशिवाय गाडगेनगर हद्दीतील अवैध धंदे तत्काळ बंद करा, अन्यथा संपूर्ण अवैध धंद्यांची रेकॉडिंग काढून पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येईल, असा इशाराही भीम आर्मीने पोलीस आयुक्तांना दिला आहे.डीसीपी सातव करणार चौकशीभीम आर्मी कार्यकर्त्यांच्या निवेदनानंतर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याप्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडे सोपविली.भीमआर्मीच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार प्राप्त झाली. शहानिशा करून त्यातील वस्तुस्थिती शोधून काढण्याची जबाबदारी उपायुक्तांकडे दिली आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त