शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘एडीफाय’ मुख्याध्यापकाचा ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार

By admin | Updated: August 17, 2016 23:56 IST

राष्ट्रगीत आटोपल्यानंतर 'भारत माता की जय' न म्हणण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करणाऱ्या आणि तसा आग्रह धरणाऱ्या...

शिक्षिकेने घेतला आक्षेप : विहिंपची पोलीस ठाण्यात तक्रारअमरावती : राष्ट्रगीत आटोपल्यानंतर 'भारत माता की जय' न म्हणण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करणाऱ्या आणि तसा आग्रह धरणाऱ्या शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या एडीफाय शाळेच्या मुख्याधापकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी चौकशी आरंभली आहे. कठोरामार्गावर एडीफाय स्कूल आहे. शाळेतील विद्यार्थी राष्ट्रगीतानंतर 'भारत माता की जय' घोषणा देत नसल्याचे एका शिक्षिकेच्या लक्षात आले. हा राष्ट्रगीताचा अवमान असल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तीन दिवस उलटूनही शिक्षिकेला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी १० आॅगस्ट रोजी शाळेत राष्ट्रगीत झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ ही घोषणा दिली. त्यावर मुख्याध्यापकाने शिक्षिकेलाच खडसावून शाळेतून बाहेर फेकून देण्याची धमकी दिल्याचा शिक्षिकेचा आरोप आहे. शिक्षिकेने दिलेल्या माहितीवरून १२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शाळेत राष्ट्रगीत सुरू असताना विश्व हिंदू परिषदेचे काही पदाधिकारी शाळेत पोहोचलेत. राष्ट्रगीत संपल्यानंतर कोणीही 'भारत माता की जय' म्हटले नसल्याचे त्यांच्याही लक्षात आले. मात्र, तेथे उपस्थित समाजसेविका गुंजन गोळे यांनी मोठ्या आवाजात ‘भारत माता की जय’ घोषणा दिल्याने शाळेत तणाव निर्माण झाला होता. ही बाब विहिंपचे अध्यक्ष सुरेश चिकटे यांच्यासह अनेकांच्या लक्षात आली. शिक्षिकेसह या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. यावेळी विश्व हिन्दू परिषदेचे अध्यक्ष सुरेश चिकटे, अभिषेक दीक्षित, निशाद जोध, ऋषिकेश दीक्षित, मयूर श्रीवास्तव, सुभाष मसदकर, योगेश मालेकर, गुंजन गोळे, अतुल खोंड, जितेंद्र श्रीवास्तव, गजानन सोनवणे उपस्थित होते. विश्व हिन्दू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने मुख्याध्यापकांची चौकशी आरंभली आहे. शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. चौकशीअंती पुढील कारवाईची दिशा ठरवू.- यू.एल. पाटील, पोलीस निरीक्षक. एडीफायचे मुख्याध्यापक ‘भारत माता की जय’ म्हणत नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहानिशा केली असता ही बाब सत्य असल्याचे लक्षात आले. शाळेतील शिक्षिकेने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार पुढे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- विजय शर्मा, विदर्भ प्रांत गोरक्षा प्रमुख.