शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

डेंग्यू आता ‘नोटीफाईड’ आजार

By admin | Updated: July 4, 2016 00:02 IST

पावसाळयाच्या दिवसांत उद्भवणाऱ्या डेंग्यू रोगाच्या अधिसूचित आजारांच्या नोंदणी यादीत केला आहे.

शासनाची सूचना : शासकीय, खासगी रूग्णालयांत अंमलबजावणी अमरावती : पावसाळयाच्या दिवसांत उद्भवणाऱ्या डेंग्यू रोगाच्या अधिसूचित आजारांच्या नोंदणी यादीत केला आहे. यापुढे सरकारी रूग्णालयासह खासगी डॉक्टरांनी डेंग्यू रूग्णांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने २ जुलै रोजी आदेश जारी केले आहेत. सन २०१२ मध्ये जिल्ह्यासह सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली होती. आतापर्यंत या आजाराबाबत तीन हजारांवर रूग्णांच्या नोंदी आरोग्य विभागाकडे आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रूग्णांचा अधिसूचित आजारांच्या नोटीफाईड यादीत समावेश करण्याची मागणी पुढे आली होती. हेल्प मुंबई फाऊंडेशन तर्फे यासाठी जनहित याचिका दखल केली होती. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचे निधन डेंग्यूमुळे झाल्याचे निष्पन्न होताच खळबळ उडाली होती. राज्यभरात तातडीने डेंग्यू रूग्णांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले होते. सरकारी आरोग्य यंत्रणेने डेंग्यूच्या नोंदी घेतल्या होत्या. मात्र, खासगी रूग्णालयांवर यासंदर्भात कोणतीही बंधने नव्हती. परंतु केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटंूब कल्याण मंत्रालयाने ९ जून रोजी डेंग्यूचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश जारी केले. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवा, महापालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही डेंग्यू रूग्णांची नोंद घ्यावी लागणार आहे. रूग्णांची आकडेवारी महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाकडे तर ग्रामिण भागात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे डेंग्यू रूग्णांची नोंद करावी लागेल.रूग्णांचा आकडा कळेलडेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत केल्याने या आजाराचा निश्चित आकडा कळू शकेल. यासोबतच औषध विक्रेत्यांपासून खासगी रूग्णालये, डॉक्टर आदींना सगळयांना डेंग्यू रूग्णांची आकडेवारी तसेच तपशीलवार माहिती नगरपालिका, महापालिका व माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने १ ते ३१ जुलैपर्यंत डेंग्यू आजाराबाबत जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. डेंग्यूचा अधिसुचित आजारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना डेंग्यू रूग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. यापूर्वी 'नोटीफाईड' आजारामध्ये कॉलरा, प्लेग या आजारांनंतर आता डेंग्यूचा समावेश केला आहे.तसे आदेश मिळाले आहेत.- सुरेश तरोडेकर,जिल्हा हिवताप अधिकारी, अमरावती