शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:25 IST

शहरात सर्वदूर डेंग्यूने कहर केल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या मोहिमेत काही महाविद्यालये, शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहिमेदरम्यान आढळलेली डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून शालेय जनजागृती मोहिमउपत्तीस्थळ निष्कासित
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सर्वदूर डेंग्यूने कहर केल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या मोहिमेत काही महाविद्यालये, शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहिमेदरम्यान आढळलेली डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यात आली आहेत.शहरातील खासगी रूग्णालयात दाखल डेंग्यू संशयितांची संख्या २६७ वर गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आ. रवि राणा यांच्या भेटीनंतर आयुक्तांनी डेंग्यू नियंत्रणासाठी ५२ पथके गठित केली. त्यापूर्वीही मोहीम राबविली जात होती. मात्र, राणांच्या तंबीने मोहिमेला गती देण्यात आली. रविवार २२ जुलैपासून शहरात ३० हजारावर गृहभेटी देण्यात आल्या. दरम्यान शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली. तेथील पाणीसाठे रिकामे करण्यात आले. सर्वाधिक डेंग्यू डास उत्पत्ती स्थळे असलेल्या ठिकाणी फवारणी करण्यात आली.यात काही शाळा व सरकारी कार्यालय परिसरात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यात. डेंग्यूच्या डासांची पैदास साठून राहिलेल्या पाण्यात वातानुकुलित यंत्रे, कुलर व अडगळीत होते. आठवड्याभरापासून सार्वजनिक मालमत्ता, कार्यालये, गृहनिर्माण संस्थांची तपासणी करून डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहे.डेंग्यूच्या अनुषंगाने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून शाळा-महाविद्यालयांतील पाणीसाठे रिकाम्या करण्याच्या सूचना पथकाला दिल्या आहेत. गृहभेटीवर भर दिला जात आहे.- नरेंद्र वानखडेउपायुक्त, महापालिकामोहिमेदरम्यान काही सरकारी कार्यालये व शाळांमध्ये डेंग्यू डास उत्पत्ती स्थळे आढळून आली. १ ते १५ आॅगस्ट दरम्यान शाळा व कनिष्ट महाविद्यालयांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती करू.- एम.एम.मुरके, वैद्यकीय अधिकारी, महापालिका