शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू २५, मलेरिया ६, चिकनगुण्या २ रुग्ण, आजाराने काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाचा ग्राफ माघारताच डेंग्यूचे २५, चिकनगुण्या ०२ व मलेरियाच्या ०६ रुग्णांची नोंद झालेली आहे. शहरातील ...

अमरावती : कोरोनाचा ग्राफ माघारताच डेंग्यूचे २५, चिकनगुण्या ०२ व मलेरियाच्या ०६ रुग्णांची नोंद झालेली आहे. शहरातील आऊटस्कड भागात स्वच्छतेची वाट लागल्याने डासांची उत्पत्ती अन् अच्छाद वाढला आहे. आरोग्य व स्वच्छता यंत्रणेच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे दिवसागणिक रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे.

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २५२ नमुन्यांच्या तपासणीत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत प्रत्येकी एक चिकनगुण्या रुग्णांची नोंद झालेली आहे. डेंग्यूसारखाच असला तरी चिकनगुण्याचा आजार अनेक दिवस कायम राहतो. हा ताप बरा झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम नंतरही होत असल्याने रुग्ण जेरीस आले आहेत. जिल्हाभरात डेंग्यूचे २५ रुग्ण आढळले आहेत. २५२ रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविले होते. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७, चिखलदरा ६, अमरावती ३, चामदूर बाजार ४, नांदगाव खंडेश्वर २, चांदूर रेल्वे १ व तिवसा तालुक्यात एक मलेरियाचे १,३६,०८६ नमुन्यांची तपासणी केली असता सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व आजार डासांपासून होत असल्याने नागरिकांनी घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. महापालिका क्षेत्रात स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. बेपर्वा कर्मचारी अन् कंत्राटदार यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे.

बॉक्स

प्रत्येक व्यक्तीमध्ये डेंग्यूची लक्षणे वेगळी

डोकेदुखी, अंगदुखी व सौम्य ताप असतो. काही प्रकरणात गंभीर लक्षणे दिसून येतात. रक्तदाब कमी होणे, रक्ताच्या प्लेटलेटमध्ये कमी येणे याशिवाय १०४ पर्यंत ताप, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्यांच्या मागे वेदना होतात, काही रुग्ण एका आठवड्यात बरे होतात, तर काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसतात.

बॉक्स

तीव्र सांधेदुखी चिकनगुण्याचे लक्षण

या रोगाची लागण होताच थंडी वाजून ताप येणे, उलटी होणे, अन्नावरची इच्छा कमी होणे, डोके दुखणे यापैकी कोणतेही एक लक्षण या आजारात ठळकपणे दिसून येतात. काहीवेळा अंगावर पुरळदेखील येतात. सांधेदुखीमुळे रुग्णाला फार चालताना त्रास होतो. रक्ताची चाचणी करून चिकुनगुण्याचे निदान केले जाते. याशिवाय अन्य चाचण्या करूनही या आहाराचे निदान केले जातात. काही रुग्ण आठवडाभरात बरे होतात. काही रुग्णांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या

डासांपासून बचाव करणे हा या रोगाचा मुख्य उपाय आहे. चिकुणगुण्या पसरविणारे डास हे प्रामुख्याने सकाळी व दुपारच्या वेळी फिरतात, त्या काळात शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. घराचा परिसर स्वच्छ ठेवून कुठेही डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी. आजार औषधांसह अंगभूत रोगप्रतिकारशक्तीमुळे बरा होतो. यासाठी पुरेशी विश्रांती, द्रवरूप आहार व वेदनाशामक औषधी घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो.

बॉक्स

तापाच्या आजारात लक्षणे समान

तापांमुळे होणाऱ्या आजारांत जवळपास अनेक लक्षणे सारखीच आहे. मलेरियात थंडी वाजून ताप येणे, राहून राहून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी होणे, पोटदुखी, हगवण, अतिसार, अंगदुखी, शरीरात वेदना होणे, सांध्यामध्ये वेदना होणे, नाडीची गती जलद होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. रुग्णांची तपासणी करून यकृत व लिव्हरचा आकार वाढला आहे का, याची तपासणी केली जाते व रक्ताची चाचणी करून निदान केले जाते.