आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील अमरावती गार्डन क्लॅब व डॉ. एम.एम.शहा स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गानजीक असलेल्या महापौर यांच्या बंगल्यासमोर कनक शहा यांच्या निवासस्थानी १७ व १८ डिसेंबर दरम्यान शेवंतीच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी एकाच ठिकाणी ३० ते ४० प्रकारच्या विविध नावीन्यपूर्ण प्रजातींची माहिती विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.शेवंती प्रदर्शनीचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून अमरावती गार्डन क्लॅबच्या अध्यक्षा सुचिता खोडके, सचिव रेखा मग्गीरवार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला एकाच ठिकाणी ३० ते ४० प्रकारच्या विविध प्रजातींचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, येथे चार शाळांचे ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रदर्शनीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनीमधून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचा व शेवंतीची लागवड व विविध प्रजातींची माहिती देण्याचा उद्देश असल्याची माहिती माजी प्राचार्या ऊर्मी शहा यांनी लोकमतशी बोलताना दिली स्नो बॉल, कोसाग्रण्डा, बिरबलसहाणी, महात्मा गांधी, सिल्क ब्रोकेड या वैशिष्ट्यपूर्ण शेवंतीच्या प्रजाती प्रदर्शनीमध्ये बघायला मिळणार आहे. यामध्ये पांढरा, पिवळा, लाल, पर्पल व आॅरेंज आदी विविध रंगांच्या प्रजाती विद्यार्थ्यांना येथे पाण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
विविध शेवंतीच्या प्रजांतीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:29 IST
येथील अमरावती गार्डन क्लॅब व डॉ. एम.एम.शहा स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गानजीक असलेल्या महापौर यांच्या बंगल्यासमोर कनक शहा यांच्या निवासस्थानी १७ व १८ डिसेंबर दरम्यान शेवंतीच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
विविध शेवंतीच्या प्रजांतीचे प्रदर्शन
ठळक मुद्देएम.एम. शहा प्रतिष्ठानाचा उपक्रम : विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न