शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहापूर्वीच नियोजित वराने केली शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:12 IST

विवाहापूर्वी डॉक्टर तरुणीला चिखलदराला नेऊन नियोजित डॉक्टर वराने तिच्यावर शरीरसुखासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्याने विनयभंग करून पाच लाखांच्या हुंड्याची मागणी केल्याची तक्रार पीडिताने मंगळवारी सायंकाळी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली.

ठळक मुद्देडॉक्टरविरुद्ध फे्रजरपुरा ठाण्यात गुन्हा : विनयभंग करून पाच लाख मागितले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विवाहापूर्वी डॉक्टर तरुणीला चिखलदराला नेऊन नियोजित डॉक्टर वराने तिच्यावर शरीरसुखासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्याने विनयभंग करून पाच लाखांच्या हुंड्याची मागणी केल्याची तक्रार पीडिताने मंगळवारी सायंकाळी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली.पोलीस सूत्रानुसार, आशिष रमेश करोडे (रा. नाचगाव, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. अमरावती शहरातील रहिवासी एका डॉक्टर तरुणीचे आशीष करोडेशी २७ मे रोजी साक्षगंध पार पडले. ९ नोव्हेंबर रोजी लग्न ठरले. दरम्यान, आशीषने दोन लाखाची रोख व तीन तोळे सोन्याची मागणी केली. याशिवाय मुलीला फोन करून चिखलदरा सहलीकरिता येण्यासाठी दबाव टाकला. नियोजित पतीच असल्याने तिने होकार दिला. २२ जुलै रोजी ती आशिषसोबत सहलीसाठी गेली. त्या ठिकाणी आशिषने बळजबरी करून शरीरसुखाची मागणी तिच्याकडे केली. आशिषने लज्जास्पद कृत्य केल्याचे पाहून ती विवंचनेत पडली. मात्र, त्याला तिने ठामपणे नकार दिला. यामुळे चिडलेल्या आशिषने पुन्हा पाच लाख मागितले आणि न दिल्यास लग्न करणार नाही, असा पवित्रा घेतला. आपला विश्वासघात व फसवणूक केल्याचे पीडिताच्या निदर्शनास येताच या घटनेची तक्रार पीडिताने फे्रजरपुरा पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी आरोपी आशिष करोडेविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३५४, ५००, ५०१, सहकलम ३, ४, हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.पीडित मुलगी सुशिक्षित आहे. तिची तक्रार प्राप्त झाली असून, आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.- आसाराम चोरमलेपोलीस निरीक्षक.