२५ प्रकरणे : मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येथील लोकशाही दिनाच्या कामाचा आढावा घेतला. दोन प्रकरणे दाखल असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. विविध विभागाशी संबंधित नागरिकांनी २५ निवेदने दाखल केली सदर निवेदन संबंधित अधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या कार्यवाहीकरीता हस्तांतरित करण्यात आली. या प्राप्त झालेल्या निवेदनावर चर्चा करण्यात येऊन संबंधित कार्यालय प्रमुखांनी निवेदने निकाली काढण्यास सांगितले
लोकशाही दिनात दोन प्रकरणे निकाली
By admin | Updated: February 4, 2016 00:20 IST