शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरधारकांना ‘डिमांड नोटीस’

By admin | Updated: February 26, 2017 00:14 IST

महापालिका क्षेत्रातील १८२ पेक्षा अधिक मोबाईल टॉवरधारकांना मालमत्ताकर विभागाकडून ‘डिमांड नोटीस’ पाठविण्यात आल्या आहेत.

करविभागाची कारवाई : ३१ मार्चची डेडलाईनअमरावती : महापालिका क्षेत्रातील १८२ पेक्षा अधिक मोबाईल टॉवरधारकांना मालमत्ताकर विभागाकडून ‘डिमांड नोटीस’ पाठविण्यात आल्या आहेत.त्यांना ३१ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकी भरणे अनिवार्य आहे. आयुक्त हेमंत पवार, कर मुल्यांकन अधिकारी महेश देशमुख आणि पाचही सहायक आयुक्तांनी या थकबाकीसाठी ‘इनिशिएटीव्ह’ घेतले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमिवर शहरातील सर्व मोबाईल टॉवरधारकांकडून मालमत्ताकर वसूल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्यानंतर संबंधित झोनकडून त्यांना ‘डिमांड नोटीस’ पाठविण्यात आल्यात. महापालिका हद्दीतील १८२ मोबाइल टॉवर कराच्या अखत्यारीत आल्याने महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १ ते सव्वा कोटी रुपयांची भर पडणार आहे. बेबंद झालेल्या मोबाईल टॉवर धारकांवर डिसेंबर १०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लगाम घातला होता. त्याअनुषंगाने नव्या निर्देशानुसार मोबाईल टॉवर हे ‘इमारत’ या संस्थेत मोडत असल्याने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्याकडून मालमत्ताकर वसूल करावा, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मोबाईल टॉवरधारकांना थकित कर रकमेचा भरणा करावा, यासाठी डिमांड नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सोमवार २७ फेब्रुवारीपासून या वसुलीला गती मिळणार आहे. १८२ पैकी १५३ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची बाब डिसेंबर २०१५ मध्ये उघड झाली होती. मनपाची परवानगी न घेता आणि कर न देता हे टॉवर्स उभारले गेल्याने तीन टॉवर जमिनदोस्त करण्यात आले होते.याअनुषंगाने प्रशासनाने टॉवर्सची अधिकृतता तपासावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. असे होते आयुक्तांचे आदेशसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मोबाईल टॉवर हे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५ नुसार ‘इमारत’ या सज्ञेत मोडते. तसा अंतिम आदेशच सर्वोच्च न्यायालयाने पारित केला आहे. त्या अनुषंगाने महापालिका हद्दीत असलेले सर्व मोबाईल टॉवर या मालमत्तेची थकित कराची मागणी तसेच वसुलीबाबत आवश्यक कारवाई करावी, असे आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी सर्व सहायक आयुक्तांना डिसेंबर १६ मध्ये दिले होते.त्या याचिकेवर ‘सुको’चे आदेशसन २०१५ साली जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरने अमरावती महापालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी ५७७/२०१५ या क्रमांकाने रिटपिटीशन दाखल करून घेण्यात आली होती. त्यानंतर ६११/२०१६ या रिटपिटीशनवर १६ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्या निकालाच्या आधारे मोबाईल टॉवरधारकांकडून मालमत्ता कर वसुलण्याचा महापालिकेचा मार्ग प्रशस्त झाला होता. त्याआधारे आयुक्तांनी आदेश पारित केलेत.