शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांबू वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:18 IST

बांबूपासून तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू गरजेच्या असून, बांबू हस्तकला व कला केंद्राच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करतील, असा विश्वास राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देडिजिटल उद्घाटन : बांबू हस्तकला व कला केंद्राला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बांबूपासून तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू गरजेच्या असून, बांबू हस्तकला व कला केंद्राच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करतील, असा विश्वास राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे डिजिटल उद्घाटनदरम्यान त बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष अतिथी म्हणून पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे, पुणेच्या महापौर मुक्ता टिळक, वन विभाग सचिव विकास खारगे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी. विभनाथा उपस्थित होते.केंद्राचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत तीनही विद्यापीठांनी हे केंद्र उभारले आहेत. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर व इतर कुलगुरुंनी परिश्रम घेतले आहेत. त्यासाठी राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख, डी.टी.इंगोले, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, सुलभा पाटील, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, विद्यार्थी कौशल्य विभागाचे श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.