शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डेल्टा प्लस, ५९४ नमुने तपासणीसाठी दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

खबरदारीचा उपाय, पुणे ‘एनआयव्ही’लाही नमुने, अहवाल अद्याप अप्राप्त अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत राहण्याची शक्यता असलेला ‘डेल्टा प्लस ...

खबरदारीचा उपाय, पुणे ‘एनआयव्ही’लाही नमुने, अहवाल अद्याप अप्राप्त

अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत राहण्याची शक्यता असलेला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’मुळे विभागाची चिंता वाढली आहे. या विषाणूचा शिरकाव होऊच नये, याकरिता प्रशासनाद्वारे सावधगिरीचे उपाय अवलंबले जात आहेत. सध्या चार जिल्ह्यातील ५९४ नमुने पुणे एनआयव्ही व दिल्ली येथील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. अद्याप अहवाल अप्राप्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचे जे म्युटेशन सापडले होते. त्याला ‘डेल्टा व्हेरिएंट’ नाव देण्यात आले होते. आता यामध्ये पुन्हा म्युटेशन होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झालेला आहे व दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडाली होती. यातून सावरत नाही तोच या नवा व्हेरिएंटने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढविली आहे.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. हा विषाणू घातक असल्यामुळेच चिंता वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार पुन्हा २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या म्युटेशनमध्ये आढळून आलेलीच लक्षणे डेल्टा ‘प्लस’मध्ये आढळतात. मात्र, संसर्ग झाल्यावर झपाट्याने प्रकृती खालावते डोकेदुखी, घशाला सूज, नाक गळणे, याशिवाय ताप ही प्राथमिक लक्षणे आहेत. राज्यासह लगतच्या मध्य प्रदेशात या विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने विभागाची चिंता वाढली आहे.

बॉक्स

‘आरएनए’ व्हायरसचे म्युटेशन जास्त

कोविड-१९ हा ‘आरएनए’ व्हायरस असल्याने म्युटेट होण्याची शक्यता जास्त आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळचा डेल्टा व्हेरिएंट आता म्युटेंट झाल्यानंतर आता ‘प्लस’ व्हेरिएंट समोर आला आहे. याविषयी अधिक संशोधन येत्या आठवड्यात समोर येणार आहे. या विषाणूची जनुकीय तपासणी सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

सर्वाधिक २१४ नमुने बुलडाणा जिल्ह्यातील

आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार विभागातील ५९४ नमुने तपासणीसाठी पुणे व दिल्ली पाठविण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक २१४ नमुने बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. याशिवाय अकोला १२०, अमरावती १३० व यवतमाळ जिल्ह्यातील १३० नमुने असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.