शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

शनिवारी ‘डिलिव्हरी; सोमवारी १.९४ कोटी बहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:45 IST

देयकाची संचिका (फाईल) डाक किंवा लिपिकाकरवी न फिरविता हातोहात फिरवून केवळ दोन दिवसांत १.९४ कोटी रुपयांचे देयक संबंधित कंपनीला प्रदान करण्याचा महापालिकेतील प्रताप सोमवारी उघड झाला.

ठळक मुद्देअधीक्षक चौहान संशयाच्या भोवऱ्यात : महापालिका प्रशासनाची अशीही गतिमानता

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देयकाची संचिका (फाईल) डाक किंवा लिपिकाकरवी न फिरविता हातोहात फिरवून केवळ दोन दिवसांत १.९४ कोटी रुपयांचे देयक संबंधित कंपनीला प्रदान करण्याचा महापालिकेतील प्रताप सोमवारी उघड झाला.२ कोटी ४ लाख रुपये किमतीचे ‘मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन’ रविवारी महापालिकेत दाखल झाले. ते संपूर्ण सुसज्ज वाहन येण्यापूर्वीच त्याचे कोट्यवधीचे देयक देण्यात आल्याने अग्निशमन अधीक्षकांसह संबंधित अन्य संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अग्निशमन विभागाला वाहन पुरविणाऱ्या कंपनीला २२ डिसेंबर २०१७ ला १.९४ कोटी रुपये दिले गेले. प्रत्यक्षात वाहन पुरवठा मात्र २० मे २०१८ रोजी करण्यात आला. निविदेतील स्पेसिफिकेशननुसार वाहनाचा पुरवठा झाला नसताना संपूर्ण रक्कम अवघ्या दोन दिवसांत दिल्याने कमिशनखोरीच्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.हातोहात फिरविली फाईलसंबंधित कंपनीने पुरवठा केलेले वाहन निविदेमधील तांत्रिक अटी-शर्ती पूर्ण करणारे नसतानाही विभागप्रमुखांनी अगदी दुसºयाच दिवशी देयक प्रस्तावित केल्याने अग्निशमन अधीक्षकांसह अन्य संबंधित संशयाच्या भोवºयात आले आहेत. महापालिकेत ‘दलाल’ म्हणून सर्वश्रुत असलेल्या ‘एसडी’ने ही फाइल हातोहात फिरविली. प्रत्येकाला ठरलेला टक्क्का मिळाला आणि रेकॉर्डब्रेक वेळात १ कोटी ९४ लाख ६ हजार ३१५ रुपये निधी एंटरप्रायजेसला बहाल करण्यात आले. पुरवठा आदेशाच्या तब्ब्ल सात महिन्यानंतर महापालिकेत हे वाहन पोहोचले आहे.अन्य कंत्राटदार वा एजंसीच्या बिलाला सहा-आठ महिने लागत असताना १.९४ कोटी रुपये अवघ्या दोन दिवसांत दिले गेले.अवघ्या दोन दिवसात देयक काढण्याची ही गतिमानता अन्य बाबतीत प्रशासनाची दाखविली असती, तर अनेक प्रश्न निकाली निघाले असते, अशी तिखट प्रतिक्रिया महापालिकेत यानिमित्ताने उमटली आहे. यात लाखांची बिदागी संबंधितांना पोहोचल्याचा गंभीर आरोप आहे.वाहन तपासणी कुणी केली?१६ डिसेंबर २०१७ रोज शनिवार रात्री हे वाहन अग्निशमन विभागास मिळाले, अशी माहिती अधीक्षकांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. २ कोटी ४ लाख रुपये किमतीचे वाहन हस्तांतरित करून घेत असताना ते वाहन स्पेसिफिकेशननुसार आहे किंवा कसे, हे पाहणे अनिवार्य होते. अग्निशमन अधीक्षक तांत्रिक तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे अधीक्षकांनी त्या वाहनाची तपासणी न करता मिळाल्याची नोंद घेतली. एवढेच काय तर योग्यरीत्या पुरवठा झाल्याने देयकही प्रस्तावित केले. त्यामुळे वाहनाची संपूर्ण तपासणी न करता लगेचच दुसऱ्या दिवशी देयके प्रस्तावित करणारे अधीक्षक चव्हाण यांनी या अनियमितेत की-रोल वठविल्याचे स्पष्ट आहे.वाहन मल्टियूटिलिटीअग्निशमन यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी महापालिकेने ‘मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला. निधी एंटरप्रायजेसला १७ आॅक्टोबर २०१७ ला पुरवठा आदेश देण्यात आले. २ कोटी ४ लाख २७ हजार ७०० रुपये किंमत ठरली. निधी एंटरप्रायजेसने १६ डिसेंबर २०१७ रोजी वाहन पुरवठा केल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे आहे.१८ डिसेंबरपासून फायलीचा प्रवासनिधी एंटरप्रायजेसकडून हे वाहन १६ डिसेंबरला आल्यानंतर १८ डिसेंबर रोजीच अधीक्षक भारतसिंह चौहान यांनी देयक प्रस्तावित केले. त्यावर मुख्य लेखापरीक्षक व मुख्य लेखाधिकाऱ्यांनी १८ ला, तर उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी १९ डिसेंबर रोजी स्वाक्षरी केली. २२ डिसेंबर रोजी आयकर व अन्य कर कपात करुन १.९४ कोटी रुपये अदा करण्यात आले. फाईल हातोहात फिरविण्यात आली.