शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सनियंत्रण समिती बैठकीला विलंब अध्यक्षांनी मागितला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:18 IST

जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘आमचं गाव,आमचा विकास’ आराखडाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंण समितीची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : नियोजित वेळ टळल्याने पदाधिकारी गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘आमचं गाव,आमचा विकास’ आराखडाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंण समितीची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे ही सभा दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात बोलविण्यात आली होती. मात्र, ही बैठक तब्बल दीड तास म्हणजेच दुपारी १.३० वाजता बैठकीला येण्यासाठी अध्यक्षांना आवतन देण्यासाठी पंचायत विभागाचे अधिकारी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या दालनात पोहोचले असता अध्यक्षांनी संनियंत्रण समितीची सभेची वेळ किती वाजता होती, असा प्रश्न उपस्थित करीत ज्यावेळी बैठकीला हजर राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नियोजित वेळेवर सभागृहात पोहोचले त्यावेळी एकही कर्मचारी वा अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. या प्रकारावर अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी संताप व्यक्त करीत बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी वेळ व दिवस अगोेदरच निश्चित केल्यानंतर प्रशासनाकडून पदाधिकारी हजर अन् कर्मचारी अधिकारी गैरहजर असा प्रकार दिसून आल्याने २१ नोव्हेंबर रोजी अध्यक्षांनी जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओंना संनियत्रण समिती बैठकीला विलंब केल्याप्रकरणी लेखी स्वरूपात खुलासा दोन दिवसात सादर करण्यात यावा, असे पत्र अध्यक्षांनी पंचायत विभागाला दिले आहे.संनियत्रण समितीची बैठक असल्याने नियोजित वेळी सभागृहात पदाधिकारी पोहचले. मात्र, त्या ठिकाणी कुणीही हजर नव्हते. तब्बल दीड ते दोन तास उशिरा ही सभा सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाला शिस्तीचा विसर पडल्याचे अनेकदा अनुभवले. याला चाप बसणे आवश्यक आहे.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष जिल्हा परिषद