शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कांडलीतील ध्येयवेड्या युवकाची दिल्ली ते कारगील 'तिरंगा' दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, भंडारासह विदर्भातील जिल्हा मुख्यालयी भरती परीक्षा दिल्यात. शारीरिक क्षमताही सिद्ध केली.

ठळक मुद्देजिद्द : सैन्यदलात दाखल होण्याचे स्वप्न

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली येथील २२ वर्षीय सुमित गौर नामक युवकाने भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खांद्यावर तिरंगा घेऊन दिल्ली ते कारगील, अशी दौड लावली आहे. ५ डिसेंबरला दिल्लीच्या इंडियागेटवरून तो कारगीलच्या दिशेने निघाला. १०६८ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करून भारतीय सैन्यदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तो भेटणार आहे. सैन्यदलात भरती करून घेण्याबाबत सुमित त्यांना विनवणी करणार आहे.लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, भंडारासह विदर्भातील जिल्हा मुख्यालयी भरती परीक्षा दिल्यात. शारीरिक क्षमताही सिद्ध केली. प्रत्येक बाबतीत सरस ठरलेल्या सुमितचे भरती परीक्षेदरम्यान संबंधित यंत्रणेने कौतुकही केले. पण, प्रत्येक वेळी काही सेंटीमिटरच्या उंचीअभावी तो मागे राहिला.दरम्यान, देशप्रेम आणि देशसेवेच्या अनुषंगाने सुमितने परत एकदा प्रयत्न करण्याचा विचार केला आणि सैन्यात भरती होण्याकरिता ही दिल्ली ते कारगील दौड त्याने सुरू केली. रस्त्याची त्याला फारशी माहिती नसली तर नॅशनल हायवेच्या मदतीने तो कारगीलच्या दिशेने सोनीपत, पाणीपत, पठाणकोटच्या पुढे निघाला आहे.

टॅग्स :Soldierसैनिक