शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता

By admin | Updated: February 26, 2017 00:02 IST

सकस आहाराची कमतरता, धकधकीचे जीवन, आरोग्य समस्यांडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण असल्याचे ...

ग्रामीण भागात वाढला टक्का : औषधी घेण्याकडे महिलांची उदासीनताअमरावती : सकस आहाराची कमतरता, धकधकीचे जीवन, आरोग्य समस्यांडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ९० टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. ग्रामीण भागात या प्रमाणाचा टक्का अधिक आहे. शासकीय रुग्णालयात मोफत औषधांची सोय असूनही, महिला औषधी घेण्यास पुढे येत नाहीत. यामुळे समस्यांमध्ये भर पडत आहे. यामध्ये थायरॉईडचे प्रमाण मात्र कमी आहे. केवळ तीन टक्के महिलाच या आजाराने त्रस्त आहेत. कुटुंबाचा गाडा हाकताना महिलांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. जेवणेवेळेवर न करणे ही अनेक महिलांना सवय आहे. जेवण करताना देखील शिळे अन्न टाकून द्यायची त्यांची इच्छा होत नाही, महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हिमोग्लोबीनचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते.गर्भवतींमध्ये प्रमाण अधिकअमरावती : महिलांमध्ये किमान १२ टक्क्याचे प्रमाण आवश्यक आहे. परंतु, सध्या हे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांवरच आले आहे. त्यामुळे प्रसूतीच्यावेळी रक्तदाब वाढून रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे प्रसूतीकाळात महिलांनी खाण-पानावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.बाळाला थायरॉईडचा धोकाजिल्ह्यातील ३ टक्के महिला थायरॉईडने ग्रस्त आहेत. वयाच्या तिशीनंतर होणारा हा आजार आता १० ते १२ वर्षांतदेखील होऊ लागला आहे. शरीरातील आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास तो उद्भवतो. अशा रुग्णांचे वजन वाढणे, मानसिक आजार होणे, केस पिकणे, लहान मुली लवकर वयात येणे आदी लक्षणे दिसतात. गर्भधारणेच्या वेळी आईला थायरॉईडचा आजार असल्यास तो बाळालाही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. घरच्यांची काळजी घेण्याच्या व्यापात महिला स्त:कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हिमोग्लोबीन कमी होणे आदी समस्या उद्भवतात. हिमोग्लोबीन वाढण्यासाठी औषधी घेण्यासोबतच सकस आहार घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे.- अंजली देशमुख, स्त्रीरोग तज्ज्ञ