शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कर यंत्रणेत खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:06 IST

नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात अर्थात मे मध्ये कर व स्वच्छता यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहेत. हे बदल करवसुली लिपिक, सहायक आयुक्त, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांपर्यंत व्यापक असतील. महापालिका प्रशासनप्रमुख हेमंत पवार यांनी याअंतर्गत खांदेपालटाचे सुतोवाच केले आहे.

ठळक मुद्देकाही नव्या मालमत्ता रेकॉर्डवर नाहीत : मोनोपल्ली मोडून काढण्याचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात अर्थात मे मध्ये कर व स्वच्छता यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहेत. हे बदल करवसुली लिपिक, सहायक आयुक्त, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांपर्यंत व्यापक असतील. महापालिका प्रशासनप्रमुख हेमंत पवार यांनी याअंतर्गत खांदेपालटाचे सुतोवाच केले आहे.अनेक वर्षांपासून करवसुली लिपिक त्याच प्रभागात व एकाच झोनमध्ये कार्यरत असल्याने त्यांची मोनोपल्ली वाढली आहे. दुसऱ्या कर लिपिकाला ते आपल्या प्रभागात प्रवेशही देत नाहीत. अनेक नव्या मालमत्ता या करवसुली लिपिकांना ज्ञात असतानाही त्या रेकॉर्डवर येत नाहीत, अनेक मालमत्तांमध्ये झालेले बदल, अनधिकृत बांधकाम करवसुली लिपिकांच्या डोळ्यातून सुटत नाही. तथापि, ती माहिती अधिकृतरीत्या प्रशासनाकडे पोहोचत नसल्याने महापालिकेला मोठ्या रकमेच्या कराला मुकावे लागते. एवढेच काय तर काही-काही करवसुली लिपिकांचे बंगले नजरेत भरण्यासारखे आहेत. त्यातून या यंत्रणेला भ्रष्टाचाराने पोखरल्याचे निरीक्षण आयुक्त पवार यांनी नोंदविले होते. त्यावर त्यांनी गतवर्षी बदलीचा उतारा शोधला होता. मात्र, आता बदल्या केल्यास नव्या लिपिकांना घरे शोधण्यास अडचणी निर्माण होतील, ही सबब पुढे करून तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी त्या बदल्या थांबविल्या. त्यानंतर याच करवसुली लिपिकांनी २० हजार नव्या मालमत्ता शोधून काढल्याचा दावा संयुक्तपणे करण्यात आला. त्या मालमत्ता या करवसुली लिपिकांनी शोधल्यात की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी हा भाग वादातीत असला तरी याच यंत्रणेने मावळत्या आर्थिक वर्षात ४७.२२ कोटी मागणीच्या तुलनेत ३६ कोटी वसूल केलेत, ही वस्तुस्थिती आहे. करयंत्रणाही आता थोडी सैल झाली आहे. ताण कमी झाला आहे. त्या पार्श्वभूमिवर करवसुली लिपिकांचे बदली सत्र राबविले जाणार आहे. एप्रिल-मे मध्ये खांदेपालट केल्यास संबंधित करवसुली लिपिकाला संबंधित प्रभागाचे बारकावे समजावून घेण्यास पुरेसा वेळ मिळेल, भ्रष्टाचाराला लगाम बसेल आणि कुठल्याही बाबूला एसीबीत देण्याची गरज भासणार नाही. या भूमिकेतून कर यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहे.स्वास्थ्य निरीक्षकांच्याही बदल्यातूर्तास २२ प्रभागांत ४३ स्वास्थ्य निरीक्षक व ५ ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कार्यरत आहेत. त्यांची अदलाबदलीसुद्धा करण्यात येणार आहे. अनेक स्वास्थ्य निरीक्षकांवर संबंधित नगरसेवकांचा अधिक लोभ असल्याने ते एकाच ठिकाणी चिटकले आहेत. याशिवाय मुख्यालयात काम करण्यास ‘रस’ नसलेल्या एका वैद्यकीय अधिकाºयाची बदली प्रस्तावित आहे. या डॉक्टरने अनेकदा स्वत:हूनच बदली मागून आपल्याला काम करण्यात इंटरेस्ट नसल्याचे प्रशासनाला कळविले असल्याने त्यांच्या बदलीचीही शक्यता बळावली आहे.