शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दीपक लढ्ढा यांचे हल्लेखोर अद्याप फरारच

By admin | Updated: August 9, 2015 00:34 IST

मागील ७ जुलै रोजी स्थानिक आठवडी बाजार परिसरात असलेल्या गोकुळडुसा जिनमध्ये निवासस्थानी ...

अंजनगावातील प्राणघातक हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?अंजनगाव सुर्जी : मागील ७ जुलै रोजी स्थानिक आठवडी बाजार परिसरात असलेल्या गोकुळडुसा जिनमध्ये निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात येथील व्यापारी दीपक लढ्ढा गंभीर जखमी झाले होते. या घटनेत आता एक महिना पूर्ण झाल्यावरही हल्लेखोरांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. २५ जुलै रोजी लढ्ढा यांना रुग्णालयातून सुटी मिळाली व ते सध्या अमरावतीत नातेवाईकांच्या घरी आहेत. लढ्ढा गेल्या एक महिन्यात ईश्वर कृपेने दुरुस्त झालेत पण पोलिसांना मात्र तपासाचा सूर गवसला नाही. तपास यंत्रणेवर असलेला कामाचा ताण समजू शकतो, पण ज्या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण शहर व परिसर ढवळून निघाले त्या घटनेबद्दलचे मौन व सामसूम पोलीस विभागाच्या दबंग प्रतिमेशी विसंगत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा पातळीपासून सक्रिय असणारी यंत्रणा, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, स्थानिक गुन्हे शाखा, सायरन वाजवीत जाणाऱ्या गाड्या, वरिष्ठांना सॅल्युट मारणारे शिपाई हा संपूर्ण ताफा पाहून हल्लेखोर लवकरच पकडले जातील, असे जनतेला वाटत होते. पण एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला होतो आणि महिनाभरानंतरही तपासात प्रगती होत नाही, याचा निश्चित संबंध पोलीस विभागाच्या विश्वसनीयतेशी आहे. हे प्रकरण संपूर्णत: दीपक लढ्ढा यांच्या विश्वासार्ह बयाणावर अवलंबून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लढ्ढा यांनी दिलेल्या बयाणावरून तपासाची कोणतीच दिशा निश्चित न झाल्याने अजूनही हल्लेखोर कोण होते, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. लढ्ढा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने व संपूर्ण घटनेचा अभ्यास केला असता जोपर्यंत ते स्वत: या घटनेचे रहस्य उजागर करीत नाहीत तोपर्यंत तपासाला योग्य गती लाभणार नाही, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. घटनेच्या दिवशी ज्या तरुणीला घटना स्थळाहून पोलिसांनी ताब्यात घेतले तिची सातत्याने चौकशी आणि उलट तपासणी करण्यात आली. पण तिच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती प्राप्त झाली नाही. या तरुणीने पोलीस विभागाला तपासात संपूर्ण सहकार्य केल्यामुळे ही तरुणी प्रत्यक्षदर्शी पुरावा असल्यामुळे तपासात महत्त्वाची साक्ष आहे. पण तिचे बयाण कमजोर पुरावा आहे. केवळ आर्थिक लाभासाठी मैत्री यापलीकडे पुराव्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. लढ्ढा यांच्या घरातून हल्लेखोरांनी केवळ तीन हजार सहाशे रुपये नेले. पण फक्त दीपकलाच मारले आणि तरुणीला सोडून दिले, यामुळे बदल्याच्या भावनेने ही घटना घडली असावी, इतपत निष्कर्षावर पोलीस विभाग आला आहे.