शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे आरोग्य बिघडले सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

जमीन हा पुनर्निर्माण न होणारा स्त्रोत असल्याने संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. पोत खराब होत असल्याने उत्पादन खर्च वाढून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. त्यामुळे जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते, शिफारशींनुसार पिकास समतोल प्रमाणात खतांची मात्रा देता येते. याद्वारे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. 

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रासायनिक खतांचा अनिर्बंध वापरासह  सतत पाण्याखाली राहिल्याममुळे जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ती खतांना प्रतिसाद देत नाही. दिवसेंदिवस सेंद्रीय कर्बाचे प्रमाणात कमी आढळून येत आहे. तसे निरीक्षण  ५८,५६८ नमुन्यांच्या चाचनीनंतर मृद् सर्वेक्षण चाचणी प्रयोगशाळेद्वारा नोंदविण्यात आलेले आहे.जमीन हा पुनर्निर्माण न होणारा स्त्रोत असल्याने संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. पोत खराब होत असल्याने उत्पादन खर्च वाढून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. त्यामुळे जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते, शिफारशींनुसार पिकास समतोल प्रमाणात खतांची मात्रा देता येते. याद्वारे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. शेतातील मातीचा नमुना तपासल्यानंतर जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक (पीएन व सामू), क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, पालाश, नत्र, तांबे, लोह, जस्त, मंगल, बोरॉन व गंधक आदी घटकांचे पिकांना आवश्यक असणारे प्रमाण कळते. यासाठी माती नमुना घेण्याचीदेखील विशिष्ट पद्धत आहे. नमुना पिके काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर घ्यावा लागतो. गुरे बसण्याची किंवा झाडाखालील जागा नको, खते व कचरा टाकल्याची जागा, बांधाजवळचे क्षेत्राजवळील नमुना घेऊ नये. शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करावा, असे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. 

क्षारयुक्त जमिनीसाठी उपाययोजनाक्षार संवेदनशील क्षेत्रात तूर, वाटाणा, तीळ, मुळा, चवळी, घेवडा, भेंडी, कोबी, रताळी, संत्री, मोसंबी, लिंबू व आंबा पिके घ्यावीत. मध्यम प्रकारात भात, ज्वारी, गहू, ज्वारी, मका, बाजरी, मोहरी, करडई, सूर्यफूल, एरंडी, सोयाबीन, भुईमूग, टोमॅटो, कांदा, बटाटा, गांजर, लसूण व काकडी तसेच पाण्याच्या वापरामुळे क्षाराचे प्रमाण वाढल्यास जिप्समच्या मात्रेचा वापर करावा.

सुपिकता वाढविण्यासाठी ही उपाययोजना जमिनीत आम्ल जास्त वाढल्यास  हेक्टरी ०.५ ते २.५ टन चुनखडीची पावडर वापरावी. विम्लयुक्त प्रमाण जास्त आढळल्यास चर खोचून पाण्याचा निचरा करावा व जिप्समपूड सेंद्रीय खत व प्रेसमड द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, लोहाची कमतरता असल्यास फेरस सल्फेट, हेक्टरी २५ ते ३० किलो वापरावे, तांब्याची कमतरता असल्यास कॉपर सल्फेट हेक्टरी १० ते १२५ किलो वापरावे, मंगल कमी असल्यास मॅगनीज सल्फेट हेक्टरी १० ते २५ किलो वापरावे.

जमिनीची उत्पादकता १६ घटकांवर अवलंबूनमुख्य अन्नघटक : हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद व पालाश दुय्यम अन्नघटक : कॅल्शिअम, मॅग्नेशियम व गंधकसूक्ष्म अन्नघटक : लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन व क्लोरिन

मातीपरीक्षण आधारित खतांचा वापर करावा. खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते. यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.- प्रफुल्ल सातव जिल्हा मृद् सर्वेक्षण, मृद् चाचणी अधिकारी

 

टॅग्स :agricultureशेती