शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सिंचन प्रकल्पाच्या पातळीत घट

By admin | Updated: January 5, 2016 00:10 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास आलेला वरुड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे...

नद्या कोरड्या : सिंचन प्रकल्पात ८० टक्के जलसाठावरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास आलेला वरुड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के ेजलसाठा संचयित झाला होता. आॅगष्टनंतर पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहत्या नदीचा प्रवाहसुध्दा खंडित झाला. पाणी वापर संस्थांनी वेळेआधीच पिकांना पाणी सोडण्याकरिता मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये सिंचन प्रकल्पात केवळ ८० टक्के जलसाठा असल्याने येत्या काळात तीव्र पाणीटंचाईचे सुतोवाच सिंचन विभागाने केले आहे. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्प पूर्ण जल संचय क्षमता ५१४.६५ मिटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १००.६० मिटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ मिटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मिटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४४८.३० मिटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगांव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८०.५० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८१.६० मिटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पात पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पात पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधाराची ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येतो. सिंंचन प्रकल्पाची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. यावर्षी प्रकल्पात १०० टक्के ेजलसाठा होता. जानेवारीमध्ये केवळ ८० टक्के आहे. रब्बी हंगामाकरीता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते. नद्यांना पाणी सोडावे लागते. याव्यतिरिक्त काही गावांना पिण्याकरिता पाणी पुरवठा केला जातो. याव्यतिरिक्त पाकनाला प्रकल्पसुध्दा दरवाजा बसलेला नसल्याने तांत्रिक दोषाअभावी जलसंचय होऊ शकला नाही तर, नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सिंचनाकरिता आवश्यक व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली आहे. यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी संत्रा झाडे आहे. रबी हंगामातील गहू, चना तसेच संत्रा आणि कपाशी, मिरची आदी पिके घेण्यात येते. अत्यल्व पर्जन्यमानामुळे शेती व पाणी पुरवठयात तुटवडा येण्याची दाट शक्यता सिंचन विभागाचे अभियंता सोनारे यांनी व्यक्त केली आहे.