शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट; सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:33 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे.

अमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी-अधिक पावसाने विभागातील ३५ तालुक्यांमध्ये भूजलात १० फुटांपर्यंत घट व २१ तालुक्यांत वाढ नोंदविण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याकरिता आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ६८० निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या. यावरून किती गावांमध्ये पाणीटंचाई राहणार, याचा अहवाल शासनाला या आठवड्यात सादर होईल.यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८, व बुलडाणा जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे ३५ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये भूजलाचे पुनर्भरण झालेलेच नाही. मात्र, २१ तालुक्यांतील भूजलात १० फुटांपर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण विहिरीतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, विभागातील ५६ पैकी आठ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, १९ तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत, सात तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत तसेच एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. जिल्हानिहाय अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांतील भूजलात तूट नोंदविली गेली. 

यवतमाळात सर्वाधिक १४ तालुक्यातील भूजलात वाढअमरावती विभागात २१ तालुक्यांतील भूजलात वाढ झाल्याने रबी हंगामाचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. यामध्ये एक मीटरपर्यंत नऊ तालुके, दोन मीटरपर्यंत आठ, तीन मीटरपर्यंत तीन, तर एका तालुक्यात तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये, वाशिम जिल्ह्यात पाच, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निरीक्षण विहिरींच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणीसाठवण क्षमता घटलीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणीसाठवण क्षमता कमी आहे; मात्र यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडीफार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे या साठ्यातून भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती