शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या मानांकनात घसरण; संशोधन कार्य माघारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानांकनात गत चार वर्षात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. देशभरातील विद्यापीठाच्या मानांकनाचा अभ्यास ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानांकनात गत चार वर्षात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. देशभरातील विद्यापीठाच्या मानांकनाचा अभ्यास करणारी साई मॅगो जर्नल ॲण्ड कंट्री रँक या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळात संशोधन, सामाजिक योगदान, बांधीलकी, नाविण्यपूर्ण उपक्रम माघारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

साई मॅगो जर्नल ॲण्ड कंट्री रँक या संस्थेने अमरावती विद्यापीठाच्या सर्वसाधारण मुद्द्यांवर तसेच विशिष्ट, नेमक्या व महत्त्वाच्या अशा संशोधन, सामाजिक योगदान, सामाजिक बांधीलकी, इनोव्हेशन अर्थात नाविन्यपूर्ण, नवीन पुढाकार व नवीन उपक्रम या चार निकषांवर आधारित मानांकनात वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधी दरम्यान घसरण झाल्याचे विविध आकडेवारी देऊन प्रकाशित केले आहे.

यात स्कोपस या जगप्रसिद्ध अशा गोषवारा व प्रशस्तीपत्राच्या आधारे संशोधन व अन्य निकषांच्या आधारे जगातील व भारतातील विद्यापीठाचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थेने संबंधित विद्यापीठांच्या संकेत स्थळावरून व त्या देशातील मानांकन करणाऱ्या संस्थांकडे उपलब्ध असलेल्या संबंधित विद्यापीठाच्या विविध मुद्द्यांशी निगडित सांख्यिकी माहितीच्या आधारावर हा अहवाल जारी केला आहे. त्या आकडेवारीचा उपयोग सायमॅगो या संस्थेने केला आहे.

------------

मानांकनावर एक नजर...

२०१७ मध्ये देशातील सार्वजनिक विद्यापीठांचे, स्वायत्त महाविद्यालय, अभिमत विद्यापीठांचे एकत्रित सर्वसाधारण मानांकन करण्यात आले. यात अमरावती विद्यापीठ ४२ व्या क्रमांकावर होते. आता हे मानांकन २०२१ मध्ये घसरून १२५ वर आले आहे. तर २०२१ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ६१ व्या स्थानावर, मराठवाडा विद्यापीठ ६४ व्या स्थानी, पुणे विद्यापीठ ४४ व्या स्थानावर तर, मुंबई विद्यापीठ ६० व्या स्थानावर असल्याचे स्पष्ट केले आहे.

०००००००००००००००००००००००००

विद्यापीठाच्या मानांकनाबाबत झालेल्या सर्वेक्षणाविषयी काहीही माहिती नाही. नेमके कशाच्या आधारे सर्वेक्षण झाले, हे कळले नाही; मात्र गत चार वर्षात विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात संशोधन, सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे.

- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.