शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:02 IST

सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केली.जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्याची पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची भीषण समस्या जिल्ह्यात भेडसावू लागली आहे. शेकडो गावांवर सध्या पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे वेळेत पिण्याच्या पाण्याचे नियोजन शासनाने करावे, अशी मागणी शासनाकडे केल्याचे आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या. तिवसा व अन्य तालुक्यांमध्ये शासनाने चार वर्षांत कोणतीही नवीन सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. कायम कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणाºया गुरूकुंज उपसा सिंचन योजना जलदगतीने पूर्णत्वास येणे आवश्यक आहे. एकंदरीत पाण्याच्या नियोजनावरून हे सरकार उदासीन असल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले.नाफेड खरेदीतही दिरंगाईदुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांनी कसेबसे सोयाबीन, मूंग आणि उडीदाचे पीक घेतले. परंतु, शासनाकडून शासकीय खरेदीत दिरंगाई झाल्याने शेतकºयांना कमी भावात आपला माल विकला आहे. त्यामुळे शासनाचे धोरण व्यापाºयांचा फायदा करणारे ठरत आहे. आॅनलाईन नोंदणीदेखील शेतकºयांनाच त्रासदायक ठरत आहे. पांदण रस्त्यांची घोषणा आता विरली असून शेतकºयांची ही मागणीदेखील पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.‘जलयुक्त’मधून निधीचे सिंचनशासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसाठ्यात वाढ झाली की निधीचे सिंचन झाले, असा सवाल आ. ठाकूर यांनी केला आहे. ही योजना कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच निर्माण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील जल समस्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत चालली असून त्यावर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली आहे.