शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यााच कुलगुरूंचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 20:51 IST

अभियांत्रिकीचा पेपर फुटल्याचे प्रकरण 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेच्या मेकॅनिक्स विषयाचा  पेपर फुटला. या प्रकरणात येत्या आठ दिवसांत पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात निर्णय कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी सिनेट सभेत स्पष्ट केला.पेपरफूटप्रकरणी सिनेट सदस्य संतोष ठाकरे यांनी लक्षवेधी मांडली. या प्रकाराने विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला. पेपर कोणी फोडला, कोणते महाविद्यालय यात सहभागी आहेत, याची प्राथमिक चौकशी झाली आहे. विद्यापीठातील अस्थायी कर्मचारी आशिष राऊत याने मोबाइलवर प्रश्नपत्रिका वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कर्मचारी बोरे नामक याच्या मोबाइलवर पाठविला. ही बाब विद्यापीठ परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी चौकशीअंती समोर आणली आहे. 

सिनेट सभेत मनीष गवई, भैयासाहेब मेटकर, विवेक देशमुख, रवींद्र मुंद्रे, प्रवीण रघुवंशी, भीमराव वाघमारे, संतोष वाघमारे या सदस्यांनी पोलिसांत फौजदारी दाखल करण्याची मागणी रेटून धरली. तथापि, विद्यापीठाने याप्रकरणी त्रिसदस्यीय समिती गठित केली असून, तो अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असे कुलगुरूंनी सांगितले. अहवाल नेमका कधीपर्यंत येणार, हे स्पष्ट करण्याची मागणी सिनेट सदस्यांनी केली. यादरम्यान कुलगुरू चांदेकर यांनी येत्या आठ दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त होईल; त्यानंतर पोलिसांत दोषींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केला जाईल, असे सिनेटमध्ये सांगितले. ‘लोकमत’चे मानले आभारअभियांत्रिकीचा पेपर फुटल्याचे प्रकरण 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले. त्याद्वारे विद्यापीठात काय सुरु आहे, हे समोर आले. सिनेट सदस्य मनीष गवई यांनी त्याबद्दल 'लोकमत'चे आभार मानले.रोजंदारी कर्मचारी वापरतो १२ लाखांचे वाहनपेपरफूटप्रकरणी दोषी आढळलेला आशिष राऊत हा २६३ रुपये रोजंदारीवरील अस्थायी कर्मचारी होता. मात्र, तो १२ लाखांचे वाहन वापरत होता, ही बाब विद्यापीठाला का दिसली नाही, असा सवाल सिनेट सदस्यांनी उपस्थित केला. पेपरफूटप्रकरणी चार ते पाच ठिकाणी व्यवहार झाला. त्यामुळे सत्यता बाहेर काढण्यासाठी हे प्रकरण पोलिसांत विनाविलंब दिले पाहिजे, असेही सदस्य म्हणाले.परीक्षा संचालकांनी सांगितला पेपरफुटीचा प्रवासविद्यापीठ परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सिनेट सभेत पेपरफुटीचा प्रवास उलगडला. १६ ते २९ मे  दरम्यान या विषयाचा पाठपुरावा त्यांनी केला. ४५ मिनिटे अगोदर पेपर लीक कसा झाला, कोणाच्या मोबाइलवर हा प्रकार घडला, याची माहिती घेण्यात आली. आशिष राऊत याचा मोबाइल जप्त करण्यात आला. वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी दोन अस्थायी कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. मोबाइलमध्ये चार प्रश्नपत्रिका आढळल्या असल्याची माहिती हेमंत देशमुख यांनी दिली.पेपरफूटप्रकरणी दोषींविरुद्ध पोलिसांत फौजदारी दाखल करण्यात येईल. समितीचा अहवाल आल्यानंतर आठ दिवसांत हे प्रकरण पोलिसांत देऊ.    - मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती