शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धडकी

By admin | Updated: May 16, 2017 00:09 IST

राज्य सरकारने नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य पालिका-नगरपंचायतींमध्ये स्थानांतरण करण्याचे धोरण आखले असून ....

बदलीचे धोरण निश्चित : महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य पालिका-नगरपंचायतींमध्ये स्थानांतरण करण्याचे धोरण आखले असून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांच्या पोटात देखील यामुळे गोळा उठला आहे. ११ मे रोजी नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चितीमुळे पालिका, महानगरपालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांमध्ये ‘थोडी खुशी बहोत सारा गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.एका महापालिकेतून अन्य महापालिकेत बदली करण्याचा निर्णय धोरणात्मक आणि अतिशय क्लिष्ट असल्याने तो तुर्तास तरी प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. तथापि पालिका कर्मचाऱ्यांच्या इतर पालिकांमधील स्थानांतरणाबाबतचा शासन निर्णय धडकल्याने ‘सरकार’ महापालिकेबाबतही असाच निर्णय घेऊ शकते, अशी सूचना आहे. महापालिकेत एकदा रुजू झालेला कर्मचारी ज्या पदावर नियुक्त होतो तो त्याच ठिकाणी सेवानिवृत्त होत असल्याची परंपरा आहे. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अंतर्गत विभागाशिवाय अन्यत्र कुठेही बदली होत नसल्याने महापालिकेत या कर्मचारी-अधिकाऱ्यांची ‘मोनोपल्ली’ तयार झाल्याचे चित्र आहे. मात्र, ११ मे रोजी नगरविकास विभागाने नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत धोरण निश्चित केल्याने महापालिकेतही खळबळ उडाली आहे. नगर पालिकांप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या अन्य महापालिकांमध्ये बदल्या झाल्यास कसे होणार, असा प्रश्न कर्मचारी वर्गातून चर्चिला जात आहे.असा आहे शासन निर्णयराज्यस्तरिय संवर्गातील पदांवरील अधिकारी-कर्मचारी संपूर्ण राज्यात बदलीस प्राप्त असतील. या अधिकारी कर्मचाऱ्यांचा एका नगर परिषदेत ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात यावी, संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत एका नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये ४ वर्षांपेक्षा अधिक तसेच एकाच जिल्ह्यात २ पदावधी अर्थात ६ वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरीता ठेवता येणार नाही, असा शासन निर्णय नगर पालिकांसाठी जारी करण्यात आला आहे.