शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 24 जलदगती, 18 अतिरिक्त न्यायालये स्थापण्याचा विधी व न्याय विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:39 IST

राज्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरिता राज्यात 24 जलदगती न्यायालये आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला

अमरावती, दि. 20 - राज्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबतची प्रकरणे हाताळण्याकरिता राज्यात 24 जलदगती न्यायालये आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. यात अमरावती येथे जलदगती न्यायालय, तर अचलपुरात अतिरिक्त न्यायालयाचा समावेश आहे. या न्यायालयांसाठी न्यायाधिशांसह अन्य न्यायालयीन अधिकारी कर्मचा-यांच्या पदांना मान्यता देण्यात आली आहे.चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीमध्ये न्यायव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त न्यायालये, जलदगती न्यायलये, कौटुंबिक न्यायालये, कार्यरत न्यायालयाचे नवीनीकरण, तांत्रिक मनुष्यबळ सहाय, स्कॅनिंग व डिजिटायझेशन लॉ स्कूल, लोकअदालत, एडीआर सेंटर आणि मेशिएटर्स व सक्षमीकरण हे 11 घटक दिले आहेत. त्यासाठी सन 2015 ते 2020 या कालावधीत 1014 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पैकी 49.67 कोटी पाच वर्षे कालावधीच्या जलदगती न्यायालयासाठी नमूद केला आहे.14व्या वित्त्त आयोगाच्या अनुषंगाने खून, बलात्कार, दरोडा, अपहरण, अवैध मानवी वाहतूक हुंडाबळी या गंभीर स्वरुपाच्या बाबतीतील दाखल प्रकरणे, वरिष्ठ नागरिक, महिला, बालके, अपंग, एचआयव्ही बाधितांनी दाखल केलेली प्रकरणे, भूसंपादन, संपत्तीविषयक वाद याबाबतची दिवाणी प्रकरणे हाताळण्याकरिता 24 जलदगती न्यायालये व त्यासाठी 144 पदे निर्माण करण्यास विधी व न्याय विभागाने 18 ऑगस्टला मान्यता दिली आहे. या 24 न्यायालयांमध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावती जिल्हा मुख्यालयस्थळी हे जलदगती न्यायालय कार्यान्वित होणार आहेत.चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाने प्रलंबित प्रकरणांची संख्या विचारात घेऊन ज्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पाच वर्षांच्या कालावधीसाठी अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी 41.44 कोटी रुपये निधी आरक्षित करण्यात आला. प्रक्रियेदरम्यान 18 अतिरिक्त न्यायालयासाठी 108 पदे निर्माण करण्यास उच्चस्तरिय सचिव समितीने मान्यता दिली. त्यानुसार राज्यात तात्पुरत्या स्वरुपात 18 अतिरिक्त न्यायालये ज्या दिनांकास ते सुरू होतील तेथून पुढे पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्थापन करण्याचा निर्णयावर विधी व न्याय विभागाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. या 18 न्यायालयांमध्ये जिल्ह्यातील अचलपूर शहराचा समावेश आहे.