शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्याचे फर्मान

By admin | Updated: February 21, 2017 00:05 IST

बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या प्रयत्नाला आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी ब्रेक लावला.

आयुक्त संतापले : विभागप्रमुखांची कानउघाडणी अमरावती : बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या प्रयत्नाला आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी ब्रेक लावला. बदलीच्या ठिकाणी रुजू न होता ही बदलीप्रक्रिया ‘रद्द’ करण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्यांकडून जोरकस प्रयत्न केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी संबंधित बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांना ‘रिलिव्ह’ करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्त व संबंधित विभागप्रमुखांना दिलेत. ‘भ्रष्ट साखळीला ‘ब्रेक’ लावण्याचे आव्हान’ याशिर्षाखाली सोमवारी ‘लोकमत’ने बदली आदेशांच्या पायमल्लीवर प्रकाशझोत टाकला. आयुक्तांनी ९ फेब्रुवारीला कनिष्ठ लिपिक, वसुली लिपिक व वरिष्ठ लिपिक अशा २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. भ्रष्ट साखळी तोडण्यासाठी ही बदली प्रक्रिया राबविली गेली. यात काही नवखे असले तरी ‘चिपकू’ यानामाभिधानाला यथार्थ ठरविणाऱ्या काहींचा या यादीत समावेश होता. ९ फेब्रुवारीला बदली आदेश निघाल्यानंतर याकर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. निवडणूक काळात बदली करता येत नाही, असा सूरही निघाला. ‘जीएडी’कडून बदली आदेश घ्यायलाही अनेकांनी नकार दिला. एखाद-दुसरा अपवाद वगळता बदली आदेश घेणाऱ्यांनी निर्धारित ठिकाणी रुजू न होता ‘चिपकू’ हे त्यांचे नामभिधान खरे ठरले. आयुक्तांच्या आदेशांची पायमल्ली करीत आणि प्रशासनाला आव्हान देत अनेकांनी ‘आमचे गॉडफादर परतू द्या, आम्ही बदली रद्द करतो की नाही ते बघाच,’ असा इशाराही प्रशासन म्हणजेच एका अर्थाने आयुक्तांना देऊन टाकला. २० फेब्रुवारीपर्यंत १ ते २ कर्मचाऱ्यांचा, अपवाद वगळता उर्वरित १७ ते १८ कर्मचाऱ्यांनी निवडणूक काम, न्यायालयीन प्रकरणाचा बागुलबुवा करीत बदली झालेल्या ठिकाणी जाणे टाळले. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी आयुक्तांनी या बदलीप्रक्रियेचा विभागप्रमुखांकडून आढावा घेतला व संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने म्हणजे तासाभराच्या आत ‘रिलिव्ह’ करण्याचे फर्मान सोडले आहे. (प्रतिनिधी)सबब ऐकणार नाहीचार सहायक अयुक्तांसह बांधकाम, लेखा, जीएडी, अग्निशमन, आरोग्य आणि उद्यानासह संबंधित विभागप्रमुखांशी आयुक्तांनी सोमवारी दुपारी बदली आणि कार्यमुक्ततेबाबतची माहिती जाणून घेतली. निवडणूक कामात असतील त्यांनाही मूळ जागेवरुन तत्काळ कार्यमुक्त करा आणि बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन निवडणुकीचे काम करण्यासंदर्भात आदेश काढा, असे निर्देश आयुक्तांनी दिलेत. ही प्रशासकीय लेटलतिफी सहन केली जाणार नाही आणि कार्यमुक्ततेबद्दल कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असेही आयुक्तांनी बजावले. ९ फेब्रुवारीला काढलेल्या बदली आदेशाचा सोमवारी आढावा घेतला व संबंधित विभागप्रमुखांना बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेत. कर्मचाऱ्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे. -हेमंत पवार, आयुक्त, महापालिका