शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

अनधिकृत शाळा बंद करण्याचा निर्णय

By admin | Updated: May 25, 2016 00:28 IST

शहर व जिल्ह्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या आठ शाळा त्वरीत बंद करण्याचा ठराव मंगळवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे.

जिल्हा परिषद : शिक्षण सभापतींचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देशअमरावती : शहर व जिल्ह्यात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या आठ शाळा त्वरीत बंद करण्याचा ठराव मंगळवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण सभापती गिरीश कराळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांना दिले आहेत.जिल्हा परिषद शिक्षण विभागाची मान्यता न घेताच शहरात अनधिकृ तरित्या सुरू असलेल्या पाच आणि ग्रामीण भागातील तीन अशा ८ शाळा तातडीने बंद करण्यात याव्यात, असा ठराव शिक्षण समिती सदस्य चंद्रपाल तुरकाने यांनी सभेत मांडला. याला सभापती गिरीश कराळे यांनी अनुमोदन दिले. बंद करण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांमध्ये नारायण इंग्लिश स्कूल गोपालनगर, स्टार इंग्लिश स्कूल वलगाव रोड, बोथरा इंग्लिश स्कूल प्रवीणनगर, बुध्दिस्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, तिवसा, सेंट जेम्स प्राथमिक शाळा मोर्शी, एसडीएफ इंग्लिश स्कूल, गणेडीवाल ले- आऊट, ब्लॉसम इंग्लिश स्कूल राजापेठ आणि आयडियल इंग्लिश स्कूल, तिवसा या शाळांचा समावेश आहे. गणवेश बदलाचा प्रस्तावअमरावती : जि.प. शिक्षण समितीची सभा २४ मे रोजी दुपारी १ वाजता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात बोलविण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती गिरीश कराळे होते. सभेत जि प शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा एकच रंग करण्याबाबतचा ठराव कराळे यांनी मांडला. याला समिती सदस्यांनी एकमताने सहमती दिली. हा ठराव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी शासनाकडून मोफत पाठपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा मुद्दा सदस्य मनोहर सुने यांनी मांडला. यावर शिक्षणाधिकारी पानझाङे यांनी नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. सभेला सभापती गिरीश कराळे, सदस्य मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, मोहन पाटील, बापूराव गायकवाड, शिक्षणाधिकारी पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत उपस्थित होते.(प्रतिनिधी)