शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

लोकमत विशेष चिखलदरा (अमरावती) : कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजीकच्या गावातील ...

लोकमत विशेष

चिखलदरा (अमरावती) :

कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजीकच्या गावातील भूमकाकडे गेली. गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. मृतदेह सेमाडोह गावी आणण्यात आला. पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नातेवाइकांनी नकार दिला. शुक्रवारी दुपारी २ वाजता तब्बल २० तासांनंतर महिलेवर नातेवाइकांनी अखेर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मेळघाटात खळबळ उडाली आहे

मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी भूमका (मांत्रिक) कडे उपचारासाठी जातात. लहान मुलांच्या अंगावर डम्मा (गरम विळ्याचे चटके) देण्यासह विविध अघोरी पद्धत अवलंबविली जात असल्याचे ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाशित केले.

सूत्रांनुसार, सेमाडोह येथील ४५ वर्षीय विधवा महिलेची तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी १०.५० वाजता डॉक्टरांनी दिला. त्यानुसार सदर महिलेला होमक्वारंटाईन करण्यात आले.

बॉक्स

भूमकाकडे ठोकली धूम

तपासणी अहवालात पॉझिटिव्ह असला तरी आपणास काहीच झालेले नाही, असे तिने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यंत्रणेला सुनावून तिने उपचारासाठी सेमाडोहपासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाईकांकडे जाऊन कोरोना व तिला असलेल्या आजारावर भूमकाकडे उपचार सुरू केला. या दरम्यान आजार बळावल्याने गुरुवारी तिचा मृत्यू झाला

बॉक्स

रात्रभर मृतदेह पडून

महिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री ८ वाजता सेमाडोह येथील घरी आणण्यात आला. गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. महेश कूर्तकोटी, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, सरपंच अनिता चिमोटे, ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे यांना पाचारण केले. अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. सर्वांनी समजाविले तरी नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या हट्टामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेला मृतदेह रात्रभर घरीच ठेवण्यात आला. अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------

सेमाडोह येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू शुक्रवारी भवई गावात झाला. उपचारासाठी ती मांत्रिकाकडे गेली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी गुरुवारी रात्री प्रचंड विरोध दर्शविला.

- माया माने, तहसीलदार, चिखलदरा

-----------पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पीईपी किट घेऊन आरोग्य कर्मचारी स्थानिक प्रतिनिधी गुरुवारी रात्रभर त्यांच्या नातेवाइकांना समजून घातली. मात्र, त्यांनी कुणाचेच ऐकले नाही. महिलादेखील औषध उपचार सुरू असताना भूमकाकडे उपचारासाठी गेली व तेथे तिचा मृत्यू झाला.

- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा