शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यदर्शनाने घाबरलेल्या मादी सायाळचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:36 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागात मुनष्यदर्शनाने घाबरलेल्या एका मादी सायाळचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. घाबरल्याने सायाळचा मृत्यू झाल्याचे पशू वैद्यकीय विच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. सायाळ हा वन्यजीव विभागाच्या वर्गवारीत क्रमांक १ चा प्राणी आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या एमबीए विभागात आढळला : पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले विच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागात मुनष्यदर्शनाने घाबरलेल्या एका मादी सायाळचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. घाबरल्याने सायाळचा मृत्यू झाल्याचे पशू वैद्यकीय विच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. सायाळ हा वन्यजीव विभागाच्या वर्गवारीत क्रमांक १ चा प्राणी आहे.एमबीए विभागप्रमुख संतोष सदार यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजता परिसरातील लॉनवर सायाळ मृतावस्थेत असल्याची माहिती शिपायांनी दिली. त्यानंतर सदार यांनी ही बाब सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांना कळविली. कालांतराने वनविभागाच्या चमुला पाचारण करण्यात आले. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या निर्देशानुसार घटनास्थळी वनपाल एस.डी. टिकले, किशोर डहाके, ओंकार भुरे आदी पोहचले. या चमुने मृत सायाळचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले. सायाळच्या मृत्युचे नेमके कारण काय? याचा शोध घेणे वनविभागापुढे आव्हान होते. त्यामुळे वनविभागाने तज्ञ्ज पशूवैद्यकीय अधिकाºयांकडून विच्छेदन करवून घेतले. मृत सायाळ हे पाच वर्षांचे होते. पशू वैद्यकीय अधिकारी कुळकर्णी यांनी विच्छेदनानंतर वस्तुनिष्ठ अहवाल वन विभागाला दिला. विद्यापीठात बिबट, मोर, कोल्हा आता सायाळ देखील असल्याचे समोर आले आहे.परिसरात वन्यजीवांचा संचार हा नवीन नाही. साप, मोर, कोल्ह्यांचा नियमित वावर आहे. मात्र, सायाळ मृतावस्थेत आढल्याने आम्हालाही धक्का बसला. त्याचा मृत्यू कशाने झाला, याचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी वनविभागाला पाचारण केले. हे सायाळ चार वर्षांचे असण्याचे अंदाज आहे.- संतोष सदार,विभागप्रमुख एमबीएविद्यापीठात मृतावस्थेत आढळलेले मादी सायाळ हे पाच वर्षांचे होते. ती गर्भवती होती. तिच्या पोटात दोन पिले असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. घाबरल्यामुळे ते सायाळ दगावल्याचे पशू वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.- कैलास भुंबर,वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी