शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

एसटीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन एसटींची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:59 IST

येथील विश्रामगृहासमोरील वळणावर एसटीच्या धडके त एका १३ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत दोन बसेस पेटविल्या.

ठळक मुद्देअग्निशमन वाहन फोडले : संतप्त जमावाची दगडफेक, पाच जण जखमी, कर्फ्युसदृश स्थिती

आॅनलाईन लोकमतवरुड : येथील विश्रामगृहासमोरील वळणावर एसटीच्या धडके त एका १३ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत दोन बसेस पेटविल्या. यात पाच जण जखमी झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या अग्निशमन वाहनाची तोडफोट करण्यात आली.जमावाला शांत करण्यासाठी आलेल्या तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनादेखील धक्काबुुक्की करण्यात आली. शहरात तणाव वाढल्याने दुकाने बंद करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मोठी हानी होऊ नये, यासाठी एसटी आगारातून बसेस इतरत्र हलविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. वृत्त लिहिस्तोवर वरूड शहरात कर्फ्युसदृश स्थिती होती. पोलीस तपास सुरू होता.मोहंमद ताबीज मोहमंद फिरोज (१३ रा. इस्लामनगर, वरूड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो घटनास्थळानजीकच्या शांतिनिकेतन स्कूलचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. सकाळी १२ वाजताच्या सुमारास सायकलने शाळेत जात असताना तावीजला स्थानिक विश्रामगृहानजीक अमरावतीकडे जाणाºया एमएच ४० एन ८४९० या बसची धडक लागली. बसचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाली. एसटी चालकाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत असतानाच जमावातून दगडफेक सुरू झाली. काहींनी बस जाळली. यात याच भागातून अमरावतीकडे जाणारी एमएच ४० एच ८४५२ या एसटीलाही नागरिकांनी आग लावली. जमाव अनियंत्रित झाल्याने दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी बसचालक अब्दूल रफिक अब्दूल रऊफ (५६,रा.पुसला) यास अटक केली. पोलीस तपास करीत आहे.अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीजमावाच्या असंतोषावर नियंत्रण मिळविण्यासाठी तहसीलदार आशिष बिजवल, उपविभागीय अधिकारी दिलदार तळवी, ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे, बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील हे पोलीस दलासह दाखल झाले. त्यांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. तीन तास शहरातील वाहतूक पूर्णत: खोळंबली होती. दंगानियंत्रक पथक वरूड शहरात गस्त घालीत आहे.अग्निशमन वाहन फोडलेपेटलेल्या एसटी बसेसना विझविण्याकरिता वरूड नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन आल्यावर त्यावरही दगडफेक केली. यात त्याचे नुकसान झाले. नजीकच्या शेंदूरजनाघाट नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शहरातील शाळांना सुटी देण्यात आली. दुाकनेसुद्धा बंद करण्यात आली. आग विझविताना प्रभाकर काळे, मुकीमसह पाच जण दगडफेकीत जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्रकाराचे मोबाईल व कॅमेरे हिसकाविण्याचा प्रकरही घडला.