शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:41 IST

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात केंद्र शासनाने मोठी सुधारणा केली आहे. २१ एप्रिल २०१८ पासून 'क्रिमिंनल लॉ अमेंडन्मेंट अ‍ॅक्ट आॅर्र्डिनन्स २०१८' या नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १२ ते १६ वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

ठळक मुद्देसीपींकडून पोलिसांना मार्गदर्शन : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यात मोठी सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात केंद्र शासनाने मोठी सुधारणा केली आहे. २१ एप्रिल २०१८ पासून 'क्रिमिंनल लॉ अमेंडन्मेंट अ‍ॅक्ट आॅर्र्डिनन्स २०१८' या नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १२ ते १६ वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. या कायद्याविषयी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी महिला तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्व ठाण्यातील पोलिसांनाही या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.दिल्ली येथील निर्भया प्रकरणाची ेगंभीर दखल घेत केंद्र शासनाने भादंविच्या कलम ३७६ मध्ये सुधारणा केली. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट २०१३ या कायद्यात अंमलात होता. या कायद्याचा अभ्यास करून त्यात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाने 'क्रिमिनल लॉ अमेंडन्मेंट अ‍ॅक्ट आॅर्डिनन्स २०१८' अमलात आणला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व राज्यांतील पोलीस विभागाला मिळाले आहेत. अमरावती पोलीस आयुक्तालयालाही याविषयी सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कार्यशाळा घेऊन महिला तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.महिला अत्याचाराविषयक गुन्ह्यात योग्य व कसोशीने तपास करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. या कार्यशाळेला उपस्थित पोलिसांना विधी अधिकारी विश्वास वैद्य यांनीही मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा प्राप्त व्हावी, या उद्देशाने अमरावती पोलीस प्रयत्न करीत असून, गेल्या वर्षात सहा प्रकरणांमधील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.अशा आहेत कायद्यातील सुधारणाभादंविच्या कलम ३७६ मध्ये आरोपींना कमीत कमी सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती. आता नव्या कायद्यात ती शिक्षा दहा वर्षांची करण्यात आली आहे. पोटकलम ३ वाढविण्यात आली आहे. या कलमान्वये १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा वा आजन्म कारावास भोगावा लागणार आहे. कलम ३७६ (अ)(ब) मध्ये १२ वर्षांखालील मुलीवर अत्याचार करणाºयाला २० वर्षे आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कलम ३७६ मध्ये डीए, डीबी वाढविण्यात आली असून, त्यामध्ये १२ ते १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा वा आजन्म कारावासाची तरतूद केली आहे. या गुन्ह्यातील तपास पूर्ण करण्यासाठी यापूर्वी तीन महिन्यांची मुदत होती; आता ती दोन महिन्यांचीच आहे. १२ ते १६ वर्षीय मुलींवर अत्याचार करणाºयांना आता अटकपूर्व जामीनसुद्धा मिळणार नाही. सीआरपीसीच्या ४३८ कलमामध्येही सुधारणा करण्यात आली आहे.