शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हा येथे एसटीखाली चिरडल्याने वृध्दाचा मृत्यू

By admin | Updated: February 20, 2016 00:41 IST

एसटीतून खाली उतरताच चाकाखाली येऊन एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९. १५ वाजताच्या सुमारास वऱ्हा बसस्थानकावर घडली.

अमरावती : एसटीतून खाली उतरताच चाकाखाली येऊन एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९. १५ वाजताच्या सुमारास वऱ्हा बसस्थानकावर घडली. रामराव आकाराम वाघमारे (७०) असे मृतकाचे नाव आहे. अशाच अपघात मागील वर्षी माहुली (जहागिर) येथे चिमुकल्या साहिल डायरेचा बसखाली आल्याने मृत्यू झाला होता. याच घटनेचा हा अपघात पुनरावृत्ती ठरला. नागरिकांच्या रोषाला पोलिसांनी वेळीच आवर घातल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यातंर्गत घोटा येथील रहिवासी रामराव वाघमारे (७०) हे सकाळी कुऱ्हा ते मोझरीकडे जाणाऱ्या बसगाडी एमएच ४०-८४५४ मध्ये घोटा येथून बसले होते. वऱ्हा गावातील बसस्थानकावर बस थांबताच ते खाली उतरले. मात्र, त्याचवेळी बसगाडी समोर जाण्यासाठी निघाल्याने रामराव हे चाकाखाली आले. त्यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. हा अपघात घडताच बस चालकांनी त्यांना बसमध्ये घेवून मोझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तेथून त्यांना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. तसेच बस आगार प्रमुखांनी इर्विन रुग्णालयात धाव घेऊन मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली. रामराम यांच्या पश्चात पत्नी कमला, एक मुलगा, दोन मुली, सुन व नांतवड असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करीत आहे.