फोटो पी ०७ मनीष तसरेकडे आहेत.
प्रदीप भाकरे
अमरावती : गतवर्षी मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग आता सव्वा वर्षानंतर आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. गेली वर्षभर तर, कोरोनाने देशवासीयांच्या डोक्यावर थैमान घातले. कोरोनाने होणारे मृत्यू हजारोंच्या घरात असताना, त्याही काळात वाहनचालक मृत्यू डोक्यावर घेऊन धुमाकूळ माजवीत राहिले. बेदरकारपणे वाहन हाकत राहिले.
मागील सहा महिन्यात तब्बल ८१ हजार वाहनचालकांवर नियमभंग केल्याने कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे जून महिना वगळता अन्य पाच महिन्यात कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन होता. तरीही वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत राहिले. अकारण बाहेर पडून त्यांनी पोलीसी महसुलात भर टाकली. तब्बल ७८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तरीही या सहा महिन्यात १५१ अपघातात ११६ जण जखमी झाले. पैकी ३८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलीस आयुक्तालयाने घेतली आहे.
अशी झाली कारवाई
महिना - केसेस- दंड (रुपये)
जानेवारी - ११२३६- १२,९०,४००
फेब्रवारी - ११४६३- १९,४८५००
मार्च - १४,८०४- १७,६४,४५०
एप्रिल- १३,०००- १०,२८६५०
मे - १५५२८- ७,५०,०००
जून - १४९३२- १०,१९,२००
-------------
असे कराल तर, वाहतूक पोलीस करतील कारवाई
हेल्मेटचा वापर न करणे, सिटबेल्ट न लावता वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, मोबाईलचा वापर करणे, मालवाहू वाहनामध्ये प्रवासी वाहतूक करणे, लाल सिग्नल जंप करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, विना इन्शुरंस व विनापरवाना वाहन चालविणे, अल्पवयीनांनी वाहन चालविणे, राँगसाईड वाहन, विना रिफ्लेक्टर व विना टेललाईट वाहन चालविणे, बंद असलेल्या वाहनांमध्ये वस्तू घेऊन जाणे, अवजड वाहन सातत्याने चालविणे, वस्तूंची असुरक्षित धोकादायक वाहतूक, बिगर नंबर, फॅन्सी नंबर प्लेट, डावीकडून ओव्हरटेक, धोकादायक रीतीने वाहन चालविणे, नो पार्किंगच्या जागी वाहने उभी करणे, डार्क ग्लास, लेन कटिंग, हॉंकिंग, म्युझिकल हॉर्न, आमरोडवर वाहने उभी करणे, प्रवेशबंदीचे उल्लंघन, जास्त प्रवासी वाहतूक, ट्रिपलसिट वाहन चालविणे, गैरकायदेशीर प्रवासी वाहतूक करणे अशा तब्बल ३० शीर्षाखाली वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.
---------------
१ ऑक्टोबर २०२० पासून झालेले बदल
१ ऑक्टोबर २०२० पासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे. पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्युमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जाणार आहे.
-------
कागदपत्र जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही
आता वाहन चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, पीयूसी यासारखी कागदपत्र जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण परिवहन विभागाला डिजिटल करण्याच्या दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा केली आहे. ज्यात आता कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ग्राह्य धरली जाणार आहेत.
----------------