शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खोकल्याच्या औषधीने मृत्यू; वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये मात्र दुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:07 IST

मेडिकल व्यावसायिक प्रफुल्ल कांबळेचा मृत्यू खोकल्याच्या औषधीच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तथापि, या औषधीमुळे मृत्यू होत नसल्याचे मत खासगी तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळेच प्रफुल्लच्या मृत्यूच्या निकर्षाबाबत संभ्रम कायम आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल कांबळे मृत्यूप्रकरण : घातपाताचे गूढ कायमच, औषधाची नशा जीव जाण्याइतपत हानीकारक नसल्याचा खासगी तज्ज्ञांचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेडिकल व्यावसायिक प्रफुल्ल कांबळेचा मृत्यू खोकल्याच्या औषधीच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तथापि, या औषधीमुळे मृत्यू होत नसल्याचे मत खासगी तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळेच प्रफुल्लच्या मृत्यूच्या निकर्षाबाबत संभ्रम कायम आहे.कुऱ्हा येथे मेडिकल स्टोअर थाटणारा प्रफुल्ल कांबळे हा ९ सप्टेंबर रोजी अमरावतीहून गावाकडे परत येत असताना बेपत्ता झाला. १२ सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह मार्डी रोडवरील अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलपासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला आढळला. मृतदेह कुजलेला असल्याकारणाने पोलिसांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जागेवरच शवविच्छेदन केले.शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात अल्कहोलिक औषधीच्या सेवनामुळे उलटी होऊन अन्नकण श्वसन नलिकेत अडकले आणि मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाºयांनी वर्तविली. दुसरीकडे खासगी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, त्या औषधीत अल्कोहोलचे प्रमाण असते; मात्र जीव जाण्याइतपत ती प्रभावी नसते. वैद्यकीय क्षेत्रातील या भिन्न मतांच्या आधारे पोलीस तपास कोणत्या निकर्षापर्यंत नेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रफुल्लचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, ही बाब व्हिसेरा अहवालातून स्पष्ट होईल. तथापि, हत्या की अपघात, अशा दोन्ही बाजूंनी पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे.तीन दिवस मृतदेह कोणालाच कसा दिसला नाही?प्रफुल्लचा मृतदेह ९ ते १२ सप्टेंबर तीन दिवसात रस्त्यावर पडून होता, तर कोणाला कसा दिसला नाही? पोलीस म्हणतात, कोणी लक्ष दिले नसेल. घटनास्थळी प्रफुल्लचा मृतदेह उपडा पडलेला होता. रस्त्यापासून आत काही अंतरावरील झुडुपात त्याचे मोपेड वाहन पडले होते. गवतातून गाडी पुढे जाऊन पडली असती, तर गवत दबलेले असते, मात्र, अशाप्रकाराची स्थिती घटनास्थळी नव्हती. त्यामुळे प्रफुल्लचा मृतदेह अलगद कोणी तरी तेथे आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सखोल तपास केला जावा, अशी मागणी होत आहे.ड्राय कफसाठी उपयोगी पडणाऱ्या औषधीचा काही जण नशेसाठी वापर करतात. मात्र, अतिसेवनामुळे जीव घेण्याइतपत ते औषध घातक नाही.- संजय शेळके, उपाध्यक्ष,केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असो.शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात मृताच्या शरीरात अल्केहोल आढळले. त्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली गेली. घातपाताच्या अनुषंगानेही तपास सुरूच आहे.- आसाराम चोरमले,पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा.