शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

डेडलाईन संपली, जीएडी अधीक्षक बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:07 IST

महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग अर्थात जीएडीच्या विद्यमान अधीक्षकाबाबत देण्यात आलेली...

महापालिकेत फाईल मिळेना : आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्षअमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग अर्थात जीएडीच्या विद्यमान अधीक्षकाबाबत देण्यात आलेली १९ आॅक्टोबरची 'डेडलाईन' संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवा गडी कोण? याबाबत महापलिका वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नियमाचे भोक्ते अशी स्वतंत्र ओळख जपलेले आयुक्त अनवधानाने झालेली प्रशासकीय चूक केव्हा सुधारतात, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.निलंबनाचा दीर्घानुभव असलेल्या कार्यालय अधीक्षकाचे भवितव्य ठरविणारी एक महत्त्वपूर्ण फाईल अद्यापही प्रशासनाच्या हाती लागलेली नाही. ही फाईल मिळो वा ना मिळो, १९ आॅक्टोबरनंतरच त्या कर्मचाऱ्यांबाबत कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त हेमंत पवार यांनी दिली होती. मात्र आचारसंहितेमुळे एसटी समितीचा दौरा रद्द झाला आणि त्या कर्मचाऱ्याला आठवडाभरासाठी संजीवनी मिळाली. त्यामुळे सोमवार २४ आॅक्टोबरला आयुक्त हेमंत पवार जीएडी अधीक्षकाबाबत हजारो कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली आहे. ज्या सामान्य प्रशासन विभागाकडे आस्थापनेची सर्वाधिक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, त्या विभागातील वातावरण एका नियुक्तीमुळे ढवळून निघाले आहे.४ आॅक्टोबरला अजय बन्सेले यांची सामान्य प्रशासन विभागात कार्यालय अधीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली. एसटी समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने ही नियुक्ती तात्पुरती स्वरुपात असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. मात्र ज्या विभागातून त्यांना निलंबित करण्यात आले, त्याच विभागात त्यांची एक्झीक्युटिव्ह पोस्टिंग कुणाच्याही पचनी पडलेली नाही. ते निलंबित आणि वादग्रस्त असल्याची बाब उपायुक्त विनायक औगड यांच्यासह आयुक्त हेमंत पवार यांच्यापासून दडपविण्यात आली. बन्सेले हे शिक्षण विभागात असताना ते तेथेही प्रचंड वादग्रस्त ठरले होते. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाची शिफारस आयुक्तांकडे केली होती. मात्र त्याच कालावधीत तत्कालीन आयुक्तांची बदली झाल्याने ती कारवाई टळली. (प्रतिनिधी)अजय बन्सेले वादग्रस्तच सुमारे १२ वर्षांपूर्वी महापालिकेत झालेल्या पदभरतीमध्ये आप्तेष्टांची निवड होण्याइतपत गुण वाढविल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर आहे. परस्पर गुण वाढवणे हा फौजदारी गुन्हा असताना त्या कर्मचाऱ्याला केवळ निलंबित करण्यात आल्याने त्यावेळीही मोठा गजहब माजला होता, अशी माहिती महापालिकेतील जुणे-जाणते कर्मचारी देतात. घरभाडे भत्त्याचा त्यांचा वाद थेट स्थायी समितीत पोहोचला होता. याशिवाय त्यांनी जीएडीमधील वरिष्ठ लिपिक प्रतिभा घंटेवार आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांच्या विरोधात शहर कोतवाली ठाण्यात धाव घेतली होती. दोघांविरुद्धही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र प्रशासकीय विषय म्हणून ती तक्रार शहर कोतवाली पोलिसांनी परत पाठविली होती.ती फाईल सापडेना निलंबन कालावधी संपुष्टात आल्यानंतर यथावकाश त्यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले. मात्र सेवेत घेण्यापूर्वी यापुढे त्यांना एक्झीक्युटीव्ह पोस्टींग देण्यात येऊ नये, या अटीवरच त्यांना महापालिकेत ‘रिस्टेट’करण्यात आल्याची नोंद त्यांच्यासंदर्भात जीएडीने चालविलेल्या फाईलमध्ये आहे. दरम्यान त्यांची कुठलीच फाईल गहाळ झाली नसल्याचा दावाही होऊ लागला आहे. निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेत असताना जीएडी स्वतंत्र फाईल चालविली जाते. नेमकी तीच फाईल दिसेनाशी झाली आहे. आयुक्तांसमोर निलंबनाचीच एकच फाईल असल्याचा बनाव रचण्यात आला आहे.