शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

रोही समजून आणली मृत कालवड

By admin | Updated: February 14, 2015 23:58 IST

राष्ट्रीय महामार्गावर लोणी (टाकळी) नजीक झालेल्या अपघातात रोही मृत्युमुखी पडल्याची माहिती वन विभागाच्या शिकार प्रतिबंधक पथकाला मिळाली.

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर लोणी (टाकळी) नजीक झालेल्या अपघातात रोही मृत्युमुखी पडल्याची माहिती वन विभागाच्या शिकार प्रतिबंधक पथकाला मिळाली. त्यानुसार चमू घटनास्थळी पोहोचली अन् मृत्यू पडलेल्या जनावराला ताब्यात घेतले. मात्र दुसऱ्या दिवशी हे जनावर रोही नसून कालवड असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेवरुन दोन दिवसांपूर्वी वनाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या तू- तू, मै- मै च्या वादाची चर्चा वन विभागात चांगलीच रंगू लागली आहे.वनविभागाचे अधिकारी, कर्मचऱ्यांना वन्यप्राणी, जनावरांची इत्यंभूत माहिती असणे अपेक्षित आहे. मात्र शिकार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुखालाच जनावरांची ओळख नसल्याचे सिद्ध झाले आहे. दोन दिवसांपूर्वी लोणी येथे राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत रोही मृत्युमुखी पडल्याची माहिती पथकाला मिळाली. काही वेळाने हे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाहून मृत जनावर ताब्यात घेऊन ते येथील वडाळी वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात आणले गेले. मात्र यावेळी हजर असलेल्या काही वनकर्मचाऱ्यांनी हे वन्यप्राणी रोही नसून कालवड (गाईचे बछडे) असल्याचे वारंवार सांगितले. परंतु शिकार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुखांनी हे वन्यप्राणी रोहीच असल्याचा दावा केला. कालवड की रोही? यावरुन वनकर्मचारी आणि अधिकारी यांच्यात बराच वाद झाला. अखेर शिकार प्रतिबंधक पथकप्रमुखांनी हे मृत प्राणी येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात नेले. वडाळी येथील वनकर्मचारी शिकार प्रतिबंधक पथकाला सहकार्य करीत नाही, असा आरोप करुन या पथकाच्या प्रमुखाने सीसीएफच्या पुढ्यात तक्रारीचा पाढा वाचला. पथकाने ताब्यात घेतलेले हे मृत प्राणी नेमके काय? हे सीसीएफने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मृत प्राणी रोही नसून कालवड असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना वन्यप्राण्यांबाबतची माहिती नसल्याचे दिसून येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मृत कालवड वरुन दोन बड्या अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारदेखील करण्यात आली. वनविभागात परस्पर हेवे दावे, वाद असल्याचे स्पष्ट होते.