लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : प्रेमात अडसर ठरलेल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिलेल्या दोघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी मृताची पत्नी अनुराधा व आरोपी उमेश सावळीकर यालाही धामणगाव दिवाणी फौजदारी न्यायालयाने बुधवारपर्यंत कोठडी सुनावली होती. दरम्यान मृत हनुमंत याची दुचाकी वकनाथ परिसरातील वर्धा नदीच्या पात्रातून सोमवारी पोलिसांनी बाहेर काढली.मंगरूळ दस्तगीर येथील हनुमंत साखरकरची १४ फेब्रुवारी रोजी निंबोली परिसरात इलेक्ट्रिक वायरने गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून त्याच्याच दुचाकीने वर्धा नदीच्या पात्रात नेण्यात आला. तेथे आरोपी राजू कावरे व आशिष ठाकरे यांनी मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. ती दुचाकीही पाण्यात टाकली. ती दुचाकी पाण्यातून बाहेर काढण्यात मंगरूळ दस्तगीर पोलिसांना यश आले आहे. आपण आरोपी उमेश सावळीकर याच्या सांगण्यावरून व त्यासाठी ६० हजार रुपये रोख मिळाल्याने आपण हनुमंत याची हत्या केली असल्याचे मुख्य आरोपी राजू कावरे व त्याचा साथीदार आशिष ठाकरे यांनी पोलिसांसमोर कबुली दिली.दहा दिवसांपासून हनुमंत याची पत्नी अनुराधा व आरोपी उमेश सावळीकर हे हनुमंताच्या हत्येचा प्लॅन रचत होते. यापूर्वी झोपेतच त्याला गळा दाबून मारण्याचा योजना होती, असेही पोलीस तपासात पुढे आले आहे. मात्र त्यांना यश मिळाले नाही. मंगरूळ दस्तगीर महोत्सवात हनुमंत १४ फेब्रुवारी रोजी मुलीचे नृत्य पाहण्यासाठी जाणार असल्याची माहिती असल्याने वेळेवरच सुपारी देण्यात आली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असल्याची माहिती ठाणेदार दिलीप वळवी यांनी दिली.
नदीतून काढली मृताची दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST
मंगरूळ दस्तगीर येथील हनुमंत साखरकरची १४ फेब्रुवारी रोजी निंबोली परिसरात इलेक्ट्रिक वायरने गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून त्याच्याच दुचाकीने वर्धा नदीच्या पात्रात नेण्यात आला. तेथे आरोपी राजू कावरे व आशिष ठाकरे यांनी मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. ती दुचाकीही पाण्यात टाकली.
नदीतून काढली मृताची दुचाकी
ठळक मुद्देहनुमंत साखरकर हत्याप्रकरण : चौघांना पोलीस कोठडी