शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डीडीई कार्यालयातील लिपिकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:37 IST

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखों रुपयांनी गंडविणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील (डेप्युटी डायरेक्टर आॅफ एज्युकेशन) कनिष्ठ लिपिकास फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता अटक केली.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून होता पसार : नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोंनी फसवणूक

आॅनलाईन लोकमतअमरावती : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखों रुपयांनी गंडविणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील (डेप्युटी डायरेक्टर आॅफ एज्युकेशन) कनिष्ठ लिपिकास फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता अटक केली. गजानन नारायण हाते (५०,रा. महेंद्र कॉलनी) असे आरोपीचे नाव असून गेल्या दीड महिन्यापासून तो पसार होता.पोलीस सूत्रानुसार, १६ डिसेंबर २०१७ रोजी कैलास वामन दापूरकर (३२,रा.गाडगेनगर) याने फे्रजरपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. त्यामध्ये आरोपी गजानन हातेने शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर नोकरी करीत असल्याचे सांगून लिपिक पदावर नोकरी लावून देण्याची बतावणी दापूरकर यांच्याकडे केली होती. यासाठी आरोपीने १ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. ते नोकरीवर रुजू होण्यास गेले असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. १६ डिसेंबर २०१७ रोजी गजानन हातेविरुद्ध गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. फे्रजरपुरा पोलीस त्याचा शोध घेत होते. दापूरकर दररोज शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन सही करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे मंगळवारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लेवटकर व पोलीस शिपाई सायगन यांनी सापळा रचला. तो कार्यालयात स्वाक्षरी करून परत बाहेर येताच पोलिसांनी गजानन हातेला अटक केली. गजानन हाते याने लिपीक पदाची जाहिरात दिल्यानंतर बेरोजगारांना शिक्षण महासंचालकांच्या नावाचे बनावट नियुक्ती पत्र दिले. त्याने ३५ तरुणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.घराची झडती घेणारआरोपी गजानन हाते याने बनावट नियुक्तीपत्र कसे बनविले, त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याबाबत चौकशी करण्यासाठी हातेच्या घराची झडती पोलीस घेणार आहे.