शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘डीसीपीएस’मध्ये महाघोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 23:58 IST

परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना ‘डीसीपीएस’ मध्ये महापालिकेने चालविलेली लेटलतिफी कर्मचाऱ्यांच्या मुळावर आली आहे.

कोट्यवधींचा हिशेब जुळेना : कर्मचाऱ्यांचा निर्णायक लढा अमरावती : परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना ‘डीसीपीएस’ मध्ये महापालिकेने चालविलेली लेटलतिफी कर्मचाऱ्यांच्या मुळावर आली आहे. ‘डीसीपीएस’ मधील कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा हिशेब जुळवावा, असा पवित्रा घेत मनपा कर्मचाऱ्यांनी निर्णायक लढ्याची भूमिका जाहीर केली आहे. सन २००५ नंतर राज्य सरकारी सेवेत रूजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम दरमहा कपात करण्यात येते. या योजनेला ‘डीसीपीएस’ असे नामानिधान मिळाले असून तेवढीच रक्कम महापालिकेला जमा करावी लागते. महापालिकेतून सन २००५ नंतर राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेले ६०९ कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनातून आतापर्यंत ५ ते ३.५० कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. तेवढीच रक्कम महापालिकेला जमा करावी लागते व त्यावर सरकारकडून किमान ८ टक्के व्याज अपेक्षित धरले तर ही रक्कम ७ ते ७.५०कोटीपर्यंत जाऊन पोहोचते. मात्र, महापालिकेच्या लेखा विभागास या रकमेचा ताळमेळ बसविता आला नाही. डीसीपीएससाठी पात्र असणाऱ्यांमध्ये सहायक आयुक्तांपासून अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, निरीक्षक, शिक्षक तथा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. या ६०९ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून न चुकता महिन्याकाठी १० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र आपल्याच डीसीपीएस खात्यात किती रक्कम जमा झाली, याबाबत सर्व कर्मचारी अनभिज्ञ आहेत. आमची हक्काची रक्कम गेली कुठे? असा या कर्मचाऱ्यांचा रास्त सवाल आहे. कोट्यवधीची अफरातफर तर झाली नसावी ना, अशी भीती कर्मचारी व्यक्त करीत आहेत. भविष्याशी जुळलेल्या डीसीपीएसमध्ये महापालिकेने किती रक्कम टाकली, वेतनातून किती कपात झाली, हे कळण्यासाठी या योजनेचे संगणकीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यानी पाच वर्षांपासून पाठपुरावा चालविला आहे. मात्र, महापालिकेने या योजनेत केवळ ८८ लाख रूपये ‘एफडी’करुन हात वर केले आहेत. ‘डीसीपीएस’ मधील कर्मचाऱ्यांना संगणकीकृत स्लिप मिळणे अपेक्षित असताना अद्याप रकमेचा हिशोबच महापालिकेच्या लेखाविभागाला लावता आलेला नाही. (प्रतिनिधी)२१ आॅगस्टला विभागीय मेळावा डीसीपीएस योजनेत महापालिकेने चालविलेला घोळ निस्तरावा, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या वेतनातून कपात झालेली रक्कम, मनपाचा वाटा व त्यावरील व्याज अशी एकत्रित स्लिप देण्यात यावी, या विषयावर मंथन करण्यासाठी २१ आॅगस्टला विभागीय मेळावा होत आहे. या मेळाव्यात आंदोलनाचा बिगूल फुंकला जाणार आहे. लेखाविभागाची शिरजोरी लेखाविभागाच्या अधिकाऱ्याने डीसीपीएसमध्ये सुसूत्रता आणण्याऐवजी ‘शिरजोरी’ चालविल्याचा आरोप मनपा कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या निवृत्तीवेतनाचा घोळ थांबवावा, अशी मागणी लेखाविभागाकडे करण्यात आली आहे. डीसीपीएसमधील खात्यांचे संगणकीकरण करणे आवश्यक आहे. लेखाविभागाच्या हाराकिरीने आमचे भवितव्य टांगणीला लागले आहे. हिशोबाचा ताळमेळ जुळवावा.- नरेंद्र वानखडे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटनडीसीपीएस संदर्भात खाते तयार करण्यात आले आहेत. सॉफ्टवेअरही अंतिम टप्प्यात आहे. माझ्या कार्यकाळातच या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी एक बैठकही घेण्यात आली. - प्रेमदास राठोड, मुख्य लेखाधिकारी.