शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बैल पोळ्याच्या दिवशी गाढवानाही पुरणपोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

फोटो - येत आहे. २ कॉलम जागा सोडणे. रोजगाराला सहायक पशू, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजनही अनिल कडू परतवाडा : ...

फोटो - येत आहे. २ कॉलम जागा सोडणे.

रोजगाराला सहायक पशू, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजनही

अनिल कडू

परतवाडा : बैल पोळ्याच्या दिवशी गाढवांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळी भरविली गेली. अचलपूर तालुक्यासह जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने वर्षभर मालकांसाठी राबणाऱ्या गाढवांच्या श्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रथा अनेक वर्षांपासून अव्याहत सुरू आहे.

पोळ्याला गाढवे पाळणाऱ्यांकडून या प्राण्याला बैलांप्रमाणे आंघोळ घालून रंगविले गेले. रंगवलेल्या गाढवांच्या गळ्यात फुलांच्या माळा, मण्यांचे आणि घुंगराचे हार घातले गेलेत. जमेल ते अलंकार चढविले गेले. गाढवांन सोबत राबणाऱ्या कष्टकऱ्यांना नवे कपडेही घेतले गेले. हे करीत असताना गाढव पाळणाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळाला. सजवलेल्या गाढवांचे नंतर औक्षण केले गेले. पूजेनंतर त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य भरविला. त्यांच्यापुढे मालक नतमस्तक झाले.

पोळ्याच्या तब्बल दीड दिवस गाढवांकडून कोठलेही काम करून घेतले जात नाही. त्यांना पूर्णतः आराम दिला जातो. अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, रासेगाव, हरम, खानजमानगर, अचलपूर, परतवाडा तसेच चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड आणि अंजनगावमध्येही वर्षानुवर्षे ही परंपरा जोपासली जात आहे. अकोटलाही ही परंपरा आहे.

गाढवांचा पोळा

पथ्रोट येथील स्वरूपसिंग शाळेजवळ, परतवाडा येथील दयाल घाटावर आणि राशेगाव येथे दरवर्षी सार्वजनिकरीत्या गाढवांचा पोळा भरविला जातो. अकोटमध्येही हा पोळा भरतो. या पोळ्यात सजवलेली गाढव एका रांगेत तोरणा खाली उभी राहतात. यंदा शासनादेशानुसार हा पोळा भरला नाही.

कोट

गाढवांवरच आमचे कुटुंब जगते. पोळा आमच्याकरिता मोठा सण. या दिवशी आम्ही गाढवांना आंघोळ घालतो. सजवतो. रंगवतो. त्यांची पूजा करतो. त्यांना पुरणपोळी खाऊ घालतो. या दिवशी गाढवांकडून कुठलेही काम आम्ही घेत नाही. त्यांना आराम देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.

- शंकरराव धारपवार, पथ्रोट.

-----------

अचलपूरमध्ये हजारांवर गाढव आहेत. अचलपूरमध्ये पोळा भरत नसला तरी बैल पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांना आंघोळ घालतो. रंगवतो. सजवतो. त्यांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवतो.

- प्रदीप बावणे, अचलपूर