श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराबडनेऱ्यातील ब्रम्हचारी योगीवर श्री सीताराम महाराज टेम्ब्ये संस्थान दत्त मंदिर झिरी येथे दत्त जन्माच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळते. जागृत देवस्थान म्हणून परिचित असणाऱ्या या मंदिराचा मोठा भक्तवर्ग आहे. दत्तमंदिर झिरी येथे दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बडनेऱ्यातील ब्रम्हचारी योगीवर श्री सीताराम महाराज टेम्ब्ये संस्थान भाविकांची मोठी गर्दी उसळते. सीताराम महाराज टेंम्ब्ये स्वामी यांनी आपले ज्येष्ठ बंधू परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्ब्ये स्वामी यांच्याजवळ वेदाध्ययन करून धर्म जागृती व श्री दत्त संप्रदायाचा प्रसार केला. हिंगोलीच्या हेमराज सेठ मुंधडा यांना आपले उर्वरित १६ वर्षांचे आयुष्य दान करून श्री सीमाराम महाराजांना शक्ती प्राप्त झाली. पुढील प्रवासात सीताराम महाराज यांनी बडनेरा येथे प्राणायाम व ओंकाराचा उच्चार करीत देहत्याग केला. श्री क्षेत्र बडनेरा येथे श्री सीताराम महाराजांची समाधी आहे. हिंगोली येथील एकमुखी दत्तमूर्ती अन्यत्र नेत असताना प्रचंड अडथळे आले. त्यानंतर नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी यांच्या हस्ते या मूर्तीची बडनेऱ्यात स्थापना करण्यात आली. वासुदेवानंद सरस्वती व नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामींच्या नामसमाधीही येथे प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या आहे, अशी आख्यायिका दत्तमंदिर झिरी संस्थानची आहे. दत्तजयंती महोत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या मंदिराचा मोठा भक्तवर्ग आहे. दूरदुरून दत्तभक्त वर्षभर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात १८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवाची सांगता शनिवार २६ डिसेंबर रोजी महाप्रसादाने केला जाणार आहे. दत्त जन्मानिमित्त दुपारी ४ वाजता हरिभक्त पारायण रमेश गोडबोले यांचे दत्तजन्माचे कीर्तन होणार आहे.
झिरी मंदिरात दत्तजयंती उत्सव; भाविकांची मांदियाळी
By admin | Updated: December 24, 2015 00:11 IST