शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘सरल’साठी तारीख पे तारीख!

By admin | Updated: December 16, 2015 00:20 IST

जिल्हा तथा राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांनी फारशी मनावर न घेतलेली ‘सरल’ प्रणाली आता शिक्षणविभागासाठी डोकेदुखी ठरली आहे.

अमरावती : जिल्हा तथा राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांनी फारशी मनावर न घेतलेली ‘सरल’ प्रणाली आता शिक्षणविभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक शाळांनी अचूक माहिती न भरल्याने ‘स्कूल पोर्टल’ला मुदतवाढ देण्यात आली. ही शेवटची मुदतवाढ राहील, अशी तंबीसुद्धा शिक्षण विभागाने दिली आहे. १७ डिसेंबरपासून २२ डिसेंबरपर्यंत सरल प्रणालीमध्ये ‘डाटा’ भरता येणार आहे. जिल्ह्यातील १८१ शाळांनी अद्यापही लॉगईन केलेली नाही. शाळांच्या आॅनलाईन डाटा बसे तयार करणारे ‘सरल’ प्रणाली शिक्षण विभागासाठी अडथळ्याची शर्यत ठरत आहे.तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाल्यानंतरही या प्रणालीत शाळांमधून चुकीची माहिती भरल्याचे लक्षात आल्यानंतर चुकीची दुरुस्ती व ज्या शाळांनी अद्यापपर्यंत ‘लॉग-इन’ केले नाही. त्यांच्यासाठी शिक्षण विभागाचे सरल प्रणालीमधील ‘स्कुल पोर्टल’ हे संकेतस्थळ गुरुवार १७ पासून सुरु होत आहे. या कालावधीत सरल प्रणालीतील हा घोळ दूर करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षण विभागातील संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ‘सरल डाटाबेस प्रणाली’ राबविली जात आहे. त्यानुसार आॅगस्ट - सप्टेंबरमध्ये या प्रणालीत शाळा, विद्यार्थी व शिक्षक या तीन पोर्टलमध्ये माहिती भरण्याचे निर्देश होते. शासकीय शाळांसोबत स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, विना अनुदानित आदी सर्व शाळांना या प्रणालीमध्ये माहिती भरणे बंधनकारक होते. त्यानुसार संचमान्यता ठरणार होती. बहुतांश शाळांमधून भरण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे समोर आले. दरम्यान राज्याच्या शिक्षण विभागाकडे वर्ग १ ते १२ वीच्या शाळांमधील संपूर्ण माहिती चुकीची जावू नये व ज्यांनी डाटाबेस केला नाही त्यांना माहिती भरता यावी, म्हणून ही अंतीम संधी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील ‘सरल’ची स्थितीजिल्ह्यात वर्ग १ ते १२ वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या २५०० शाळा आहेत. त्यापैकी १८१ शाळांनी अद्यापपर्यंत सरल प्रणालीत ‘लॉग इन केलेले नाही. १०९३ शाळांनी लॉगइन करुन माहिती भरली. मात्र त्यात अनेक त्रृट्या आढळून आल्या. जिल्ह्यातील १६२६ शाळा सरलमध्ये उत्तीर्ण ठरल्या आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील शाळांमधून ५ लाख २७ हजार ३४९ विद्यार्थी यंदा प्रविष्ठ आहेत. नव्या मुदतीत मुख्याध्यापकांना शाळा आणि क्लस्टर स्तरावर ही माहिती भरणे बंधनकारक आहे.