शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

डेटा चोरीचा फंडा पोतदारकडून 'व्हेरिफाय'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:45 IST

एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपी परितोष पोतदार याने एटीएममधून डेटा चोरण्यासाठी वापरलेला फंडा पोलिसांनी जाणून घेतला.

ठळक मुद्देएटीएम क्लोनिंगचे प्रकरण : आरोपीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतअमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपी परितोष पोतदार याने एटीएममधून डेटा चोरण्यासाठी वापरलेला फंडा पोलिसांनी जाणून घेतला. त्याला सोमवारी शहरातील विविध एटीएममध्ये फिरवून डेटा चोरीच्या पद्धतीची माहिती पोलिसांनी 'व्हेरिफाय' केली.परितोषला न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याने शहरातील ज्या-ज्या एटीएममधून बँक खातेदारांचा डेटा चोरला, त्या-त्या एटीएमची तपासणी पोलिसांनी केली. बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाºया आंतरराष्ट्रीय टोळीतील परितोष पोतदारला गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या टोळीतील मुख्य सूत्रधार व त्याचे साथीदार दिल्लीत बसून देशभरातील अनेक राज्यांतील नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे उडवायचे. अमरावतीमधील एसबीआय बँक खातेदार एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले की, त्यांच्या मागेच उभे राहून आरोपी पोतदार कार्डचा नंबर मिळवायचा. त्याने तशी कबुली पोलिसांना दिली. मात्र, त्याचे प्रात्यक्षिक व संपूर्ण पद्धती पोलिसांनी पोतदारला एटीएममध्ये नेऊन जाणून घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस हवालदार प्रकाश जगताप, सुभाष पाटील, उमेश कापडे यांनी सोमवारी दुपारी पोतदारला शहरातील राठीनगर, शाम चौक, बडनेरा या तीन ठिकाणच्या एटीएमवर नेले होते. त्याने खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी काय व कसे काम काम केले, हे पोलिसांना दाखविले.पोतदार दाम्पत्याचे खाते गोठविण्यासाठी बँकेला पत्रपोलीस चौकशीत पोतदारचे तीन व त्याच्या पत्नीचे दोन खाते अ‍ॅक्सीस बँकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संबंधित बँक खाते गोठविण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्राद्वारे कळविले आहे.पोलीस ओडिशाला रवानाएसबीआय बँक खात्यातून रक्कम चोरणारी ही टोळी ओडिशा येथील असून, त्यांनी दिल्लीतून कारस्थानाची सर्व सूत्रे हलविली. या टोळीतील एका आरोपीला अमरावती, तर दोन आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या टोळीत आणखी तीन सदस्य मोकाट असून, त्यांच्या शोधात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या पोलीस पथक सोमवारी सकाळी ओडिशाला रवाना झाले आहे.