शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बंद पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:58 IST

शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.

ठळक मुद्देआरोप : नगर परिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रभाकर भगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.चांदूर रेल्वे शहराचे सौंदर्यीकरण व्हावे, या दृष्टीने विशेष निधीतून रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौकापर्यंत दुभाजकावर दोन्ही बाजूने १०५ पथदिवे ४ वर्षांपूर्वी बसविण्यात आले. यामुळे शहर प्रकाशझोतात आले होते. याच मुख्य रस्त्यावरून नागरिकांची सतत वर्दळ सुरू राहते. रात्रीच्या वेळी व पहाटे असंख्य प्रवासी रेल्वेतून उतरत चौकाकडे येत असताना सगळीकडे अंधार पसरलेला असतो. वर्षभरापासून सदर पथदिवे बंद असून ते केवळ शोभेची वस्तू बनली आहेत. शुक्रवारी गाडगेबाबा मार्केट, शिक्षक कॉलनी रोड, रामनगर भागातील अनेक पथदिवे बंद दिसून आले. याशिवाय शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंद पथदिव्यांबाबत नगर परिषद प्रशासनाचे तसेच सत्ताधाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासी करीत आहे. त्यामुळे दुभाजकासह संपूर्ण शहरातील पथदिवे कधी दुरूस्त होऊन शहरात प्रकाशझोत पहावयास मिळणार, हे येणारा काळच सांगेल. मॉर्निंग वॉक करणारे जातात टॉर्च घेऊनपहाटेदरम्यान अनेक शहरवासी मॉर्निंग वॉककरिता रेल्वे स्टेशनकडे जातात. परंतु पहाटेच्या वेळी बंद पथदिव्यांमुळे चक्क टॉर्च सोबत घेऊन शहरवासीयांना मॉर्निंग वॉकला जाणे भाग पडत आहे.दोन दिवसांनंतर रमजान महिना प्रारंभयेत्या २ दिवसांनंतर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात होणार आहे. या अंधाराच्या साम्राज्यामुळे त्यांनासुध्दा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे. याचा विचार करून नगर परिषदेने त्वरित पथदिवे सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दुभाजकावरील पथदिव्यांच्या आतील वायरिंंग नादुरूस्त आहे. या संपूर्ण कामाकरिता अंदाजे १० ते १२ लाखांचा निधी अपेक्षित आहे. निधी उपलब्धीसाठी प्रयत्न सुरू आहे.- रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद