शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर तालुक्यात हजार हेक्टरमधील पिके पाण्यात

By admin | Updated: August 11, 2016 00:02 IST

जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे.

संततधार पावसाचा परिणाम : शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त, दुबार पेरणीचे संकटदर्यापूर : जुलै-आॅगस्ट महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे तालुक्यातील सुमारे हजार हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दर्यापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पिकांची हानी झाली आहे.तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यातही आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीला संततधार व पाऊस सुरु आहे. परिणामी सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी-नाल्यांना पूर आला. याचा फटका तालुक्यातील नदीकाठावरील गावांमधील शेतीला बसला. तालुक्यातील सुमारे ७०० ते ८०० हेक्टरमधील पिकांचे पूर व पावसामुळे नुकसान झाले. खारपाणपट्ट्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पिके अद्यापही पाण्याखाली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने आंतरमशागत करणे शक्य नाही. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे तूर, मूग व अन्य पिकांची प्रचंड हानी झाली आहे. तब्बल ६०० हेक्टरमधील पिके पाण्याखाली आहेत.काही ठिकाणी पुरामुळे पिके खरडून गेली आहेत. तालुक्यात मागील तीन वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. चालू वर्षात मात्र २ टक्क्याने अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस अधिक आहे. तालुक्यातील खल्लार सर्कलमधील अकरा गावांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खल्लार, सांगवा, घडा, महिमापूर, उपराई व इतर गावांमधील शेतांमध्ये पाणी शिरल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनामार्फत ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा सर्वे करण्यात आला. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने त्यांना तातडीने शासनाकडून मदत अपेक्षित आहे. परिसरातील पीकहानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणतीच मदत मिळाली नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मदतीची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)माझ्या एकूण ५ एकर शेतातील पीक वडाळी नाल्याचा बांध फुटल्याने खरडून गेले. परंतु शासनामार्फत अद्यापही कोणतीच मदत मिळालेली नाही. तातडीने मदत मिळावी. -राजू कराडे,शेतकरीतालुक्यात ज्याठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी करण्यात आली आहे. पुढील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. -पी.डी.लंगोटे, कृषी अधिकारी, अचलपूर