शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर बुजले अतिक्रमणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:46 IST

गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकधी राबविणार मोहिम? : नागरिक त्रस्त, अधिकारी सुस्त; पायी चालणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. मार्गाचे नूतनीकरण केल्यावर अतिक्रमण कमी होण्याची आशा नागरिकांना होती, ती मात्र फोल ठरली आहे.शहरातील प्रमुख वर्दळीचे स्थान असलेल्या बसस्थानक परिसरात नियबाह्य पार्किंग केली जाते. यामुळे वाहनचालकांना व पादचाºयांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसस्थानकाच्या चारही बाजूने भिंत घालण्यात आली आहे. यामुळे खासगी दुकानदारांनी थेट रस्त्यावर माल विक्री करणे सुरू केला आहे. अकोट मार्गावरील आदर्श हायस्कूल, रत्नाबाई कन्या शाळेसमोरसुद्धा खासगी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यावरही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध मार्गावर प्रवासी वाहने, काळीपिळी व मालवाहतुकीच्या गाड्या मधोमध उभ्या असतात. त्यामुळे शहरात दर दोन दिवसांनी अपघात घडतात. हे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असले तरी नगर पालिकेच्या हद्दीतील सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कारवाई केल्यास राजकीय हस्तक्षेपअतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास स्थानिक राजकारणी यात आपला रस दाखविण्यास सुरुवात करतात. यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागते. यामुळे अतिक्रमण करणारे धाजावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी आहे की राजकारण्यांचे दुकान चालविण्यासाठी, असा सवाल यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.फळविक्रेत्यांचेही अतिक्रमणबसस्थानक परिसरात फळविक्रेते मुख्य रस्त्यापर्यंत हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याठिकाणी फळ विक्रेत्यांनी संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेतर्फे पूर्ण मदत केली जाईल.- गीता वंजारी,मुख्याधिकारी, दर्यापूरकाही महिन्यांपूर्वी शाळेसमोर असलेल्या अतिक्रमणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- राजेंद्र गायगोले,मुख्याध्यापक, रत्नाबाई राठी कन्या शाळा, दर्यापूर