शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

डेंग्यू धोकादायक; ‘चामडोक’ बाहेर काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:36 IST

शिरजगाव मोझरी येथील डेंग्यूसदृश रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आरोग्य प्रशासन जागे झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे आवाहन : शहरात २७ संशयित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिरजगाव मोझरी येथील डेंग्यूसदृश रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आरोग्य प्रशासन जागे झाले आहे. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांत डेंग्यूचे २७ संशयित उपचार घेत असून त्यातील प्रशांतनगरातील एक तरुण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळल्याने या संसर्गाची व्यापकता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व त्यापासून होणारे ताप अतिशय धोकादायक असून घरातील साठविलेल्या पाण्यात असलेले चामढोक (डास) प्रथम घराबाहेर काढण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.शहराच्या खासगी रुग्णालयात जे २७ संशयित उपचारार्थ दाखल आहेत त्यांचे रक्तजल नमुने यवतमाळला तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी प्राप्त झालेल्या ११ अहवालांपैकी केवळ १ रक्तजल नमुना ‘पॉझिटिव्ह आढळला आहे. तो पॉझिटिव्ह रुग्ण प्रशांतनगर परिसरातील आहे. २७ संशयितांपैकी प्रशांतनगर किशोरनगर, कल्याणनगर, फ्रेजरपुरा, मुदलियानगर, छाबडा प्लॉट, रामनगर, विजय कॉलनी परिसरात राहणारे १६ संशयित आहेत. यात नारायणनगरातील २ संशयितांचा समावेश आहे. अन्य संशयित मायानगर, गोपालनगर, वडाळी, बडनेरा, टोपेनगर, कलोतीनगर, स्वावलंबीनगर येथील रहिवासी आहेत. २७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंतचा हा अहवाल आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी जयश्री नांदूरकर यांनी गृहभेटी करून रक्तजलनमुने तपासणी मोहीम हाती घेतली आहे.प्रशांतनगरसह ज्या भागातील संशयित रुग्णालयत आहेत त्यांच्या घरासह आजूबाजूच्या घरी जाऊन साठलेली पाणी, रिकामे करून पुन्हा भरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. खासगी विहिरी पूर्णपणे झाकून ठेवण्याची सूचना करण्यात आली असून वेळेच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे, डासांना प्रतिबंध घालू शकतात, याशिवाय झोपताना पूर्ण कपडे घालून झोपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात माहिती पथकाचे वितरणही युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे.असा प्रसार : आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसºया निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. या विषाणूचे चार प्रकार डीईएनव्ही-१, डीईएनव्ही-२, डीईएनव्ही-३ आणि डीईएनव्ही-४ आहेत. हे डास साधारणपणे समुद्र सपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमटर लांब असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा सायंकाळी चावतात.निदान कसे : विशिष्ट अ‍ॅन्टीबॉडीज टाईप्स आयजीजी आणि आयजीएम एलिसा, वायरल अ‍ॅन्टीजेन (एनएस१), सेल कल्चर्स, न्यूक्लेईक अ‍ॅसिड डिटेक्शन बाय पीसीआर.औषधोपचारताप असेपर्यंत आराम करावा, ताप आल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्त्राव किंवा वरीलप्रमाणे लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. या विषाणूवर प्रतीजिविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरुपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करुन रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास प्राण वाचू शकते. पपईच्या पानाचा रस, पपई तसेच किती फळ प्लेटलेटची संख्या वाढवतात. त्यामुळे ती खाणे फायद्याचे असते. या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरणावर सध्या संशोधन सुरू आहे. आजपर्यंत मेक्सिको, फिलिपिन्स आणि ब्राझिल या देशांमध्ये डेंगवॅक्सिया या नावाची लस उपलब्ध आहे.प्रतिबंधडासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरवण्या-पासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठवू नये, डासांना प्रतिबंध घालू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.बुधवारी बैठकडेंग्यूच्या घट्ट होणाºया विळख्याबाबत ‘लोकमत’ने जागर चालविला आहे. त्याची दखल घेत महापौर संजय नरवणे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता डेंग्यूच्या उपाययोजनेबाबत बैठक घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी बैठकीच्या पूर्वतयारीसह डेंग्यूच्या उपाययोजनेला अग्रक्रम दिला आहे.