शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीत धोकादायक जलसफर !

By admin | Updated: February 13, 2016 00:13 IST

महानगरपालिकेच्या हरिभाऊ कलोती उद्यान वडळी तलावाचा कंत्राट यवतमाळ राजहंस ट्रॅव्हल्स टुरिझमला मिळाला असून पर्यटकांना त्यांच्या प्रकृतीनुसार मापाचे सुरक्षा जॅकेट पुरविण्यास अपयशी ठरत आहे.

संदीप मानकर अमरावतीमहानगरपालिकेच्या हरिभाऊ कलोती उद्यान वडळी तलावाचा कंत्राट यवतमाळ राजहंस ट्रॅव्हल्स टुरिझमला मिळाला असून पर्यटकांना त्यांच्या प्रकृतीनुसार मापाचे सुरक्षा जॅकेट पुरविण्यास अपयशी ठरत आहे. प्रशिक्षित बोटचालकांकडून पर्यटकांना बोटीत बसण्यापूर्वी समुपदेशन करण्यात येत नाही. त्यामुळे पर्यटकांच्या जिवाला धोका संभवतो. त्यामुळे बोट पाण्यात बुडून मोठा अपघात झाला, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. टूरिझमकडे १० पायडल व २ मोटरबोट आहेत. १ पायडल व १ स्कुटर बोट नादुरुस्त असल्याचे समजते. येथे ८५ सुरक्षा जॅकेट आहेत. एका मोटरबोटमध्ये एकाचवेळी ९ व्यक्ती, तलावात फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. येथे असलेले सेफ्टी, जॅकेट अनेक पर्यटकांना होतच नाहीत. कारण लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच बोटीतून तलाव भ्रमण करतात. रविवारी प्रतिनिधीने पाहणी केली असता सुरक्षा जॅकेट तर घातला. पण अनेकांनी जॅकेटचा बेल्ट बांधला नव्हता. त्यांनी बेल्ट बांधल्याची खात्रीदेखील बोटचालकाने केलेली नव्हती. मोटर व पायडल बोटमध्ये बसल्यानंतर जॅकेटचा बेल्ट कसा बांधावा, पाण्यात हालचाली कशा असायला पाहिजे. जर बोट पाण्यात बुडून अपघात झालाच तर सुरक्षा जॅकेटचा उपयोग करुन पाण्यातून कसे बाहेर पडावे, यासंदर्भाचे कुठलेही मार्गदर्शन प्रशिक्षित मोटरबोट चालकांकडून पर्यटकांना करण्यात आले नव्हते व नियमाने ते करणे गरजेचे आहे. रविवारी पंचक्रोशीतील पर्यटकांनी वडाळी तलावावर गर्दी केली होती. ३० रुपये प्रति व्यक्ती एका फैरीचा शुल्क येथे नागरिकांकडून आकारण्यात येतो.महापालिकेने तलावातील गाळ काढावातलावातील पाणी जरी खोल असेल तरी तलावाच्या भिंतीलगत प्रचंड गाळ साचला आहे. अचानक अपघात झाल्यास गाळात अडकून मृत्यू होऊ शकतो म्हणून गाळ काढण्याची मागणी आहे. नियम काय महणतात ?पाण्यात बोटींग करण्यापूर्वी, टूरिझमच्या संचालकांनी पोलीस विभागाचे व महानगरपालिकेचे ना हरकरत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा स्कुटरबोट व पायडल बोटींगमध्ये पर्यटक बसू नये, प्रत्येक पर्यटकांना बोटींग करण्यापूर्वा सुरक्षतेचे समुपदेशन करून सेफ्टी बेल्ट कसे बांधावे यासंदर्भात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. नागरिकांना बचाव करता येईल, असे मार्गदर्शक फलक लावणे अनिवार्य आहे.बोटींग चालविताना नियमांचे पालन करणे गरजचे आहे. नियमबाह्य काम होत असेल तर तपासणी करण्यात येईल. पर्याटकांना त्यांच्या शरीराच्या मापाचे सुरक्षा जॅकेट देणे अनिर्वाय आहे. यावर नियंत्रकांचे लक्ष असायला हवे.- आनंद जोशी, अभियंता महापालिका, अमरावती.