आॅनलाईन लोकमतवरूड : येथून करवार, मोर्शी व नागपूर रस्त्याचे सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम होत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे मातीचा धूर उडत असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील कपाशी, तूर, एरंडी तसेच संत्रा पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.एनएचएआयच्या अख्यातरीत असलेला वरूड, पांढुर्णा, मोर्शी आणि नागपूर रस्त्याचे सिमेंटीकरण तसेच रुंदीकरण एच.जी. इन्फ्रास्ट्रक्चरमार्फत केले जात आहे. या ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने वाहनचालकासोबतच धूलिकणांमुळे पिकांना फटका बसत आहे, यासंदर्भात संबंधित कंत्राटदार कंपनी तसेच प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर पाणी टाकण्याची गरज असताना नाममात्र पाणी टाकून देखावा केला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांत शंका निर्माण झाली आहे. धूलिकणांमुळे या परिसरातून ये-जा करणाºयांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, हे काम रेंगळल्याने शेतकºयांमध्ये असंतोष असून, त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.दर्जेदार कापसावर चढला मातीचा थररस्त्याच्या कामाचा सर्वाधिक फटका कपाशी पिकाला बसत असून, दर्जदार कापसावर मातीचा थर चढला असल्याने त्याची प्रत खराब झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचे नुकसान होणार असल्याची चिन्हे आहेत. याची तक्रार प्रशासनाकडे करूनही त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून, शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिके संदर्भात संताप व्यक्त केला आहे. या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:19 IST
येथून करवार, मोर्शी व नागपूर रस्त्याचे सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम होत आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान
ठळक मुद्देकंत्राटदाराचे दुर्लक्ष : सगळीकडे धूळच धूळ, श्वसनाचाही त्रास वाढला, नुकसानभरपाईची मागणी