शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

क्षतिग्रस्त पूल; रस्त्यांचा कायापालट निधीअभावी अडला

By जितेंद्र दखने | Updated: October 13, 2023 18:55 IST

जिल्हा परिषद : बांधकाम विभागाचा प्रस्ताव शासनाकडून बेदखल

जितेंद्र दखने, अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागात गतवर्षी झालेली अतिवृष्टी, तसेच पुरामुळे लहान-मोठे २७ पूल क्षतिग्रस्त झाले. याशिवाय ४२ किलोमीटर लांबीचे रस्ते खरडून गेले आहेत. या क्षतिग्रस्त पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अद्याप एक रुपयाचाही निधी शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचा पूरहानीचा प्रस्तावसुद्धा रखडून पडला आहे. यावरून जिल्ह्याच्या विकासाबाबत शासन किती उदासीन आहे, हे यावरून स्पष्ट होते.

मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी रस्त्यांच्या डागडुजीसाठी आवश्यक, तसेच पूरस्थितीमुळे ४२ किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक २० किलोमीटरचे रस्ते अचलपूर तालुक्यातील आहेत. खरडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरातच मिळालेली नाही. वास्तविक, गतवर्षी खरडलेले रस्ते व क्षतिग्रस्त पुलांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून पाच-सहा महिन्यांचा कालावधी लोटून गेल्यावरही दखल घेण्यात आली नाही. अशातच शासनाने पुन्हा नव्याने ४.५० कोटींचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने नव्याने या कामासाठीचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे. मात्र, अजूनपर्यंत पूरहानीच्या कामापासून जिल्हा परिषदेला शासनाकडून निधी न मिळाल्याने ही कामे दुरुस्तीपासून अद्यापही पेंडिंग पडली आहेत.शासनाकडून प्राप्त सूचनेप्रमाणे साडेचार कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. अद्याप पूरहानीच्या कामासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर याबाबत कारवाई करण्यात येईल. - दिनेश गायकवाड

टॅग्स :Amravatiअमरावती